Crime Saam tv
महाराष्ट्र

Pandharpur: मोबाईलमुळे कांड! महिलेनं सासू अन् नवऱ्याला चोपलं, लोखंडी रॉड अन् दगडाने फोडलं

Phone Dispute Leads to Violence Pandharpur Crime: मोबाईलच्या वादातून एका महिलेने पती आणि सासूला बेदम मारहाण केली आहे. या प्रकरणी सासूने सुनेविरोधात पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

Bhagyashree Kamble

मोबाईलच्या वादातून एका महिलेने पती आणि सासूला बेदम मारहाण केली आहे. ही धक्कादायक घटना पंढरपूर तालुक्यातील नळी गावात घडली आहे. क्षुल्लक मोबाईलच्या कारणावरून आरोपी महिलेचा सासू आणि नवऱ्यासोबत वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला की, तिने सासू आणि पतीवर लोखंडी रॉड आणि दगडाने मारहाण करण्यास सुरूवात केली. या घटनेनंतर महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पायल नगरे असे आरोपी महिलेचं नाव आहे. ही महिला पंढरपूर तालुक्यातील नळी गावातील रहिवासी आहे. गेल्या काही दिवसांपासून मोबाईल फोनवरून घरात वाद सुरू होता. सासू आणि पती या महिलेला मोबाईलवरून टोकत होते. यादरम्यान वाद विकोपाला गेला. आरोपी महिलेने थेट लोखंडी रॉड आणि दगडाने सासू आणि पतीला मारहाण करण्यास सुरूवात केली.

या मारहाणीत सासू आणि पती गंभीर जखमी झाले. त्यांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. महिलेच्याविरोधात पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात सासूने तक्रार दाखल केली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

बुलढाण्यात मनमानी पद्धतीने रस्त्याचे बांधकाम

बुलढाणा: खामगाव तालुक्यात घाटपुरी आणि पिंपळगाव राजा या दोन गावांना जोडणाऱ्या सुमारे १० किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे दुहेरीकरण सुरू आहे. मात्र, या रस्त्याचे बांधकाम अत्यंत हलगर्जीपणे आणि नियम धाब्यावर बसवून केले जात असल्याचे दिसून येत आहे.

आतापर्यंत एकेरी असलेला हा रस्ता दुहेरी करण्यासाठी काम सुरू असले तरी रस्ता इतका अरुंद ठेवला जात आहे की दोन वाहनांना समोरासमोर जाताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नुकतीच एक एसटी बस या अरुंद रस्त्यावरून जात असताना रस्त्याच्या कडेला कोसळली, सुदैवाने या अपघातात ३५ प्रवासी थोडक्यात बचावले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

Bigg Boss Marathi 6 Grand Finale : फिनालेच्या शर्यतीतून 'हा' स्पर्धक OUT, मास्टर माइंडचा खेळ संपला | VIDEO

SCROLL FOR NEXT