Why Omraje Nimbalkar left Uddhav Thackeray group saam tv
महाराष्ट्र

Omraje Nimbalkar : ओमराजे निंबाळकर का फुटले? एकनाथ शिंदेंचा नेमका प्लान काय? पाहा स्पेशल रिपोर्ट

Omraje Nimbalkar latest news : धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी ठाकरे गट सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

धाराशिवमधील ठाकरेसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर इतर 5 खासदारांसोबत अखेर शिंदेसेनेत पक्षप्रवेश केलाय... मात्र, या पक्षप्रवेशानंतर ओमराजेंच्या बंडखोरीमागील तर्कवितर्कांना उधाण आलंय. दरम्यान, टीएमसी खासदार फुटल्यानंतर आता ओमराजेंसह ठाकरेसेनेतील 5 खासदारांनी शिंदेसेनेत प्रवेश केलाय. त्यामुळे फक्त डीलिमिटेशन बिल पास करून घेण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर शिंदेसेनेत गेल्याची चर्चा सुरू झालीये.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मशाल चिन्हावर उभ्या राहिलेल्या आमच्या लोकांना पराभवाचं तोंड बघावं लागल्याचं ओमराजेंनी म्हटलंय. इतकंच नव्हे तर निधीअभावी मतदारसंघातील काम रखडत असल्यानं ओमराजेंनी शिंदेसेनेची वाट धरल्याचं स्पष्ट झालंय. तर दुसरीकडे, शिंदेसेनेत प्रवेश करताच एकनाथ शिंदेंनी ओमराजेंना मतदारसंघातील कामांसाठी निधी कमी न पडण्याचं आश्वासन दिलंय.

इतकंच नव्हे तर मी त्यांच्या माडीला मांडी लावून बसणार नाही तर त्यांच्या उरावर जाऊन बसणार असल्याचा निर्धार कट्टर राजकीय विरोधक राणा जगजितसिंह यांचं नाव न घेता ओमराजेंनी शिंदेसेनेतील प्रवेशाआधीच बोलून दाखवलाय.त्यामुळे ओमराजेंचे कट्टर राजकीय विरोधक असलेले राणा जगजितसिंह भाजपात असल्यानं पुढील काळात धाराशिवमध्ये महायुतीत अंतर्गत वाद उफाळून येण्याची शक्यताही नाकारत येत नाही. तर दुसरीकडे, शिंदेसेनेत प्रवेश केल्यामुळे ओमराजे निंबाळकरांची मतदारसंघावरील पकड आणखी मजबूत होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदेंनी ओमराजेंना गळाला लावून एकप्रकारे भाजपसमोर तगडं आव्हान निर्माण केल्याची चर्चा सुरू झालीये.

ब्युरो रिपोर्ट, साम टिव्ही न्यूज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लातूर जिल्ह्यातल्या सर्व शाळा सकाळच्या सत्रात, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, जून संपत आला तरी उन्हाचा पारा कमी होईना

Tuesday Horoscope: कामगारांसाठी खुशखबर मिळणार, या 5 राशींच्या व्यक्तींवर धनवर्षाव होणार; वाचा आजचे राशीभविष्य

Maharashtra Weather: आला रे आला पाऊस आला! राज्यात पुढील ८ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

कतारमधील रास लाफान येथील कारखान्यात स्फोट: १३ कामगारांचा मृत्यू, मृतांमध्ये भारतीय नागरिकांचा समावेश

बंडखोर खासदारांविरोधात ठाकरेसेना आक्रमक, नांदेड विमानतळावर जोरदार घोषणाबाजी

SCROLL FOR NEXT