Santosh Deshmukh Case 
महाराष्ट्र

Dhananjay Munde: बीडचा आका कोण? सुरेश धस यांच्या दाव्याने धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढणार?

Santosh Deshmukh Case : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडच्या आकावर आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. मात्र हा बीडचा आका कोण?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडच्या आकावर आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.. मात्र हा बीडचा आका कोण? हे भाजप आमदार सुरेश धस यांनीच स्पष्ट केलंय. नेमकं काय म्हणाले आहेत सुरेश धस? यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आमदार सुरेश धस यांच्याकडून वारंवार बीडच्या आकाचा उल्लेख केला जात होता.

बीडचा आका कोण? याबाबत धस यांनी कुणाचंही नाव घेतलं नव्हतं. आकाचे आका हे मंत्रिमंडळात असल्याचं सांगत धस मुंडेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधत होते.. मात्र पहिल्यांदाच साम टीव्हीच्या मुलाखतीत धस यांनी धनंजय मुंडे हे बीडचे मोठे आका असल्याचा उल्लेख करत खळबळ उडवून दिलीय. एवढंच नाही तर वाल्मिक कराडांनी धनंजय मुंडेंना फोन केले असतील तर त्यांच्या अडचणी वाढणार असल्याचा इशाराही धस यांनी दिलाय.

सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे आमदारांकडून धनंजय मुंडेंच्या हकालपट्टीची मागणी जोर धरत आहे. मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीने धनंजय मुंडेंचा बचाव केलाय. सीआयडीने वाल्मिक कराडला अटक केलीय. त्यातच सत्ताधारी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी कराड हे छोटे आका तर धनंजय मुंडे हे बीडचे मोठे आका असल्याचा थेट उल्लेख केलाय.. त्यामुळे कराडनंतर सीआयडी आपला मोर्चा मंत्री धनंजय मुंडेंकडे वळवणार का? आणि मुंडेंची चौकशी करणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परभणी शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस

Konkan Railway: गणेश भक्तांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेची खास रो-रो सुविधा; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Green Coffee : ग्रीन कॉफीने २ महिन्यात १७ किलो वजन झाले कमी, क्रिकेटपटू सरफराज खानने दिल्या सिक्रेट टिप्स

Body Sugar Level: रोज गोड खल्याने शरिरात शुगरचे प्रमाण किती वाढते?

Maharashtra Politics: हनी ट्रॅपचा मुद्दा गाजत असतानाच खडसेंनी पत्रकार परिषदेतच महाजनांचा तो व्हिडिओ लावला | VIDEO

SCROLL FOR NEXT