अधिवेशन आलं की सरकार कोरोना वाढवते; राधाकृष्ण विखे पाटलांचा आरोप Saam Tv
महाराष्ट्र

अधिवेशन आलं की सरकार कोरोना वाढवते; राधाकृष्ण विखे पाटलांचा आरोप

आज सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या 121 व्या जयंती दिनानिमित्त लोणी येथे बोलत होते.

गोविंद साळुंखे

शिर्डी: अधीवेशन आलं की सरकार कोरोना (Coronavirus) वाढवते राज्यात विविध संकटे असताना जनतेला दिलासा देण्याऐवजी महाविकास आघाडीच्या सरकारला (MahaVikasAghadi ) अधिकारी कर्मचाऱ्यांची बदल्यांमध्ये जास्त रस दिसत आहे. अशी कोणती घटना घडली की अधिकाऱ्यांच्या बदलीची स्थगिती उठवण्यात आली अधिकारी कर्मचार्‍यांच्या बदल्यांमध्ये मोठा भ्रष्टाचार राज्यात झाला असल्याची टीका भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. ते आज सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या 121 व्या जयंती दिनानिमित्त लोणी येथे बोलत होते.

दुर्दैवाने अधिकाऱ्यांचे दर पत्रक छापण्यात आले होते. कोणत्या अधिकाऱ्याला कोणत्या ठिकाणी बदली द्यायची अन त्याचे पैसे किती मोजावी लागेल असे दरपत्रक काढण्यात आले असल्याचा आरोप महाविकास आघाडी सरकारवर विखे पाटलांनी केला आहे.

कोरोना काळात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना शाब्बासकी देण्याऐवजी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धंदा राज्यामध्ये सुरू आहे. या राज्यातील सर्वच मंत्री मुख्यमंत्र्यासारखे वागत आहेत. त्यामुळे आपल्या अधिकाराचा गैरवापर करून मनमानी पद्धतीने आपल्याला पाहिजे तसा निर्णय करत याच्यामध्ये जे मोठे अर्थकारण दडलेले आहे. केव्हा तरी त्याचा स्फोट होईल त्याबद्दल मी पुराव्यानिशी भूमिका अधिवेशनात घेणार असल्याचं विखे पाटील यांनी सांगितले.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

SCROLL FOR NEXT