'या व्यक्तीचं समीर वानखेडेशी नातं काय?' मंत्री नवाब मलिक यांचा सवाल  Saam Tv
महाराष्ट्र

'या व्यक्तीचं समीर वानखेडेशी नातं काय?' मंत्री नवाब मलिक यांचा सवाल

दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा हल्लाबोल कायम सुरूच आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मुंबई क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणात आर्यन खानची Aryan Khan जामिनीवर सुटका करण्यात आली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे ncb नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक Nawab Malik यांचा हल्लाबोल कायम सुरूच आहे. नवाब मलिक यांनी आता आणखी एक फोटो ट्वीट केला असून, ही व्यक्ती कोण आहे? असा सवाल करत समीर वानखेडे sameer wankhede यांच्या कुटुंबावर परत एकदा निशाणा साधला आहे.

हे देखील पहा-

नवाब मलिक यांनी एकापाठोपाठ आरोपांची मालिका सुरू केल्याने एनसीबी आणि समीर वानखेडे यांची चांगलीच कोंडी झाली आहे. नवाब मलिक यांनी काल संध्याकाळी एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये एका व्यक्तीचा फोटो आहे. ही व्यक्ती कोण आहे? असा सवाल नवाब मलिक यांनी उपस्थितीत केला आहे. हा फोटो अब्दुल अझीझचा असल्याची माहिती समोर येत आहे. अब्दुल अझीझ याचे नाव हे समीर वानखेडे यांच्या पहिल्या निकाह नाम्यात आहे.

तसेच, अब्दुल अझीझ आणि यास्मिन वानखेडे यांचे लग्न झाले होते. पण यानंतर त्यांनी घटस्फोट घेतला होता. या दोघांना एक १० वर्षांचा मुलगा देखील असल्याची माहिती सध्या समोर आली आहे. तो इटलीमध्ये आहे, याची माहिती एका माध्यमातून समोर आली आहे. नवाब मलिक यांनी या अगोदर देखील यास्मिन वानखेडे यांच्यावर आरोप केले होते. एनसीबीने कारवाई दरम्यान बनवलेला पंच फ्लेचर पटेल कोण आहे?

तसेच फ्लेचर पटेल बरोबर फोटोत असणारी लेडी डॉन कोण आहे? असा सवाल देखील नवाब मलिक यांनी विचारला होता. 'फ्लेचर पटेल लेडी डॉनच्या बरोबर फिल्म इंडस्ट्रीमध्ये काय दहशत निर्माण करत आहेत? इंडस्ट्रीत दहशत निर्माण करुन, पैसे उकळण्याचे काम करत आहेत का? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. मी एनसीबीला सांगणार आहे की एनसीबीने पत्रकार परिषद घेऊन यावर खुलासा करावा, असेही नवाब मलिक म्हणाले होते.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बारामतीत बड्या उद्योजकावर भीषण हल्ला! शहरात खळबळ

Maharashtra News Live Update: मुंबईत गॅंगवॉर खपवूनन घेतला जाणार नाही- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

त्याने आमचं ऐकलं नाही; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर 'अनिल' नावाची पोस्ट व्हायरल

Tiger Shroff Firing Video: दोन सेकंदात ५ राउंड; अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा व्हिडिओ आला समोर

टायगर श्रॉफवर ५ राऊंड फायर, गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; बॉलीवूड हादरलं | VIDEO

SCROLL FOR NEXT