Weather Update News
Weather Update News Saam TV
महाराष्ट्र

Weather Forecast : राज्यात अवकाळी पावसाची शक्यता, गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण

प्रविण वाकचौरे

मुंबई : उत्तर भारतात हाडं गोठवणाऱ्या थंडीचा अनुभव नागरिक घेत आहे. राज्यातही गेल्या दोन दिवसांपासून थंडीचं प्रमाण वाढलं आहे. थंडीसह आज राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. या ढगाळ वातावरणामुळे अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवली जात आहे. (Weather Update)

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण असल्याने काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरण आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, आग्नेय उत्तर प्रदेश ते पश्चिम विदर्भापर्यंत बदललेल्या वातावरणामुळे पुढील दोन दिवसांत दक्षिण मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.हवामान विभागाच्या इशाऱ्यामुळे मात्र शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

उत्तर भारतात थंडीची लाट

संपूर्ण उत्तर भारतात थंडीच्या लाटेमुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, झारखंड, पंजाब, हरियाणा, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि इतर राज्यांमध्ये धुक्याची दाट चादर दिसत आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, राज्याच्या विविध भागात सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ahmednagar Lok Sabha: शरद पवार गटाविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; नेमकं कारण काय?

Shivsena News: शिवसेना ठाकरे गटाला एकाच दिवसात दोन मोठे धक्के; मढवी यांना अटक तर मोरेंवर तडीपारी...

Horoscope Today: शुक्र ग्रहाचे मेष राशीत संक्रमण, मेष ते मीन राशींवर काय होणार परिणाम? वाचा राशिभविष्य...

Maharashtra Politics 2024 : नाशिकच्या रिंगणात साधू-महंतांचा 'मेळा'?; स्वामी, महंतांनी लोकसभेसाठी कंबर कसली!

LSG sv RR : राजस्थानची विजयी घोडदौड कायम; लखनौवर ७ गडी राखून मिळवला विजय

SCROLL FOR NEXT