ऑक्टोबर महिना सुरु झाला आणि राज्यातील ४५ टक्के भागात परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात ऑक्टोबर हिटचे चटके जाणवू लागले आहेत.
पावसाच्या परतीचा प्रवास सुरु झाला असून शुक्रवारपर्यंत निम्म्या महाराष्ट्रातून मोसमी वाऱ्यांनी माघार घेतली आहे. तसेच महाराष्ट्राच्या आणखी काही भागांसह अन्य राज्यांमधून मान्सून परतण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाल्याची माहिती मिळाली आहे.
भारतीय हवामान विभागाच्या (Weather Update) (आयएमडी)माहितीनुसार पुढील आठवडाभर शहर आणि उपनगरांमध्ये उन्हाचे तीव्र चटके सोसावे लागणार आहे. आयमडीच्या आठवड्याभराच्या हवामान अंदाजानुसार ९ ते १३ ऑक्टोबर २०२३ दरम्यान कमाल तापमान हे ३२ अंश सेल्सिअस असणार आहे. त्यानंतर तापमानात काही प्रमाणात घट दिसून येईल. १४ ऑक्टोबरला किमान तापमान हे ३१ अंश तर १५ ऑक्टोबरला ३० अंश सेल्सिअस असू शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
सध्या राज्यातही कमाल ८ ते १० अंशांनी तापमान वाढले असून थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरचा पार देखील २८ वर पोहोचला आहे. पुढील आठवड्याभरात हवेत आर्द्रता जाणवेल त्यामुळे उकाडयाचा त्रास सहन करावा लागेल.
राज्यातील मान्सूनने (Monsoon) परतीचा प्रवासासाठी वाटचाल सुरु केल्यामुळे २४ तासांत तापमानात ८ ते १० अंशांनी वाढ झाल्याने ऑक्टोबर हिटचा चटका राज्यभरात सर्वत्र जाणवू लागला आहे. मागील २४ तासांत सर्वत्र कोरडे वातावरण पाहायला मिळाले आहे. ६ ऑक्टोबरपर्यंत राज्यातील कमान तापमान हे २४ ते २५ अंशांवर होते. मुंबईत रविवारी ३३.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. अशातच हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे की, ११ ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण राज्यातून मान्सून माघारी परतण्याची शक्यता आहे.
1. सध्या राज्यातील कमाल तापमान किती?
अकोला- ३६.६, अमरावती- ३५.२, चंद्रपूर-३४.८, नागपूर-३५, यवतमाळ- ३५.५, पुणे ३३.९, जळगाव- ३४.४, कोल्हापूर-३३.१, नाशिक ३३.७
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.