IMD Rain Alert in Maharashtra Saam TV
महाराष्ट्र

Weather Alert : महाराष्ट्रात पुढील 48 तास तुफान पावसाचे, आज मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट

Mumbai-Pune Rain Alert : आयएमडीने आज रविवारी मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, ठाण्यासह पालघर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी केलाय.

Satish Daud

काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील विविध भागात मुसळधार पाऊस पडत आहेत. शनिवारपासून पावसाने आणखीच जोर पकडला असून आज रविवारी देखील राज्यभरात पावसाची दमदार बॅटिंग सुरू झाली, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.

आयएमडीने आज रविवारी मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, ठाण्यासह पालघर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट (Rain Red Alert) जारी केलाय. नागरिकांनी सतर्कता बाळगावी तसेच गरज असल्यास तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

राज्यभरात पुढील ४ दिवस पावसाची अशीच स्थिती कायम राहील, असं हवामानतज्ज्ञ के.एस होसळीकर यांनी सांगितलं आहे. हवामान खात्याने येत्या 24 तासांत मराठवाडा तसेच विदर्भात तुफान पावसाची शक्यता (Heavy Rainfall) वर्तवली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव तसेच परभणीत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडेल, असं हवामान तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर वाशिम तसेच गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यातही जोरदार पावसाचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव या जिह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यासह घाटमाथ्यावर आज अतिवृष्टीची शक्यता आहे. मुंबई आणि पुण्यात रविवारी पहाटेपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली असून येत्या 3-4 तासांत पावसाचा जोर आणखीच वाढणार आहे. त्यामुळे काम असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाने नागरिकांना केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ओव्हरटेकवरून वाद... नंतर रागाने पाहिलं, नागपूरात अभियांत्रिकी विद्यार्थ्याची भररस्त्यात चाकूने भोसकून हत्या

Albattya Galbattya Natak: कल्याणच्या नाट्यगृहाची अवस्था पाहून कलाकार संतापले; 'अलबत्या गलबत्या' कलाकारांचा व्हिडिओ व्हायरल

Thane Politics : ठाण्याच्या राजकारणात खळबळ! शिंदेसेनेच्या ९ नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार, कारण काय?

Kalyan Crime: पूजा पाठ करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग, कल्याणमधील संतापजनक घटना

NEET UG Exam: नीट पेपर फुटी प्रकरणात मोठी कारवाई, देशभरातून १६ संशयितांना ताब्यात

SCROLL FOR NEXT