Weather Forecast May 15 2024 IMD Rainfall Alert in Mumbai Thane Pune Nashik Saam TV
महाराष्ट्र

Weather Alert : महाराष्ट्रात आजही मुसळधार पाऊस, 'या' भागात मेघगर्जनेसह कोसळणार; IMD कडून ऑरेंज अलर्ट

Maharashtra Weather Update : भारतीय हवामान खात्याने आजही राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यापार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देखील जारी करण्यात आलाय.

Satish Daud

गेल्या आठवडाभरापासून राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, आजही राज्यात मुसळधार पाऊस पडणार, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. यापार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देखील जारी करण्यात आलाय. नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलंय.

आयएमडीच्या माहितीनुसार, आज कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट (IMD Orange Alert) जारी करण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तर मुंबईसह उपनगरात देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दुसरीकडे विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट, तर काही भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. अमरावती, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांत तुफान पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील छत्रपती, संभाजीनगर, जालना, धाराशिव, परभणी जिल्ह्याला पावसाचा इशारा देण्यात आलाय.

उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाचा यलो अलर्ट (Rain Alert) जारी करण्यात आला आहे. दरम्यान, राज्यात पावसाची संततधार सुरू असल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने हाहाकार केला आहे. पंचगंगा नदीने पात्र सोडल्याने अनेकांच्या घरात पुराचे पाणी शिरले आहे.

कोल्हापूरच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच व्हीनस कॉर्नर परिसरात तिन्ही भागातून पुराचं पाणी आलं आहे. सीपीआर ते महावीर कॉलेज रोडवरील जयंती नाल्यावरून पाणी वाहत असल्याने या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. करवीर तालुक्यातील आंबेवाडी प्रयाग चिखली परिसरात एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्याला पुराचा मोठा धोका अनेक गावातील नागरिकांनी केलं स्थलांतर करण्यात आलंय. पंचगंगा नदी ४७ फुटांवर वाहत असून जिल्ह्यातील ९४ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारे कोल्हापूर रत्नागिरी कोल्हापूर गगनबावडा हे राज्य मार्ग बंद करण्या आले आहे. जिल्हा अंतर्गत अनेक रस्त्यांवर पुराचे पाणी आल्याने वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Orry Weight Loss Tips: ओरीने २० किलोपेक्षा जास्त वजन कमी केले, पहा काय आहे सीक्रेट

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत सिद्धिविनायक दर्शनासाठी दाखल

आज लागणार महानिकाल! कसं आहे मतमोजणीचे वेळापत्रक, पाहूया

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

SCROLL FOR NEXT