Rain News in Maharashtra Today Saam TV
महाराष्ट्र

Weather Forecast : महाराष्ट्रात आजही पडणार मुसळधार पाऊस; हवामान खात्याकडून या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट

IMD Maharashtra Rain Alert : आज म्हणजेच रविवारी पावसाचा जोर आणखीच वाढणार, अशा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देखील जारी करण्यात आलाय.

Satish Daud

राज्यात मान्सूनने जोर पकडला असून सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडत आहेत. पावसामुळे नद्या-नाले तुडूंब भरून वाहत आहेत. धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा जमा झाल्याने काही शहरांचा पिण्याच्या पाण्याच प्रश्न मिटलाय. तर आज म्हणजेच रविवारी पावसाचा जोर आणखीच वाढणार, अशा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देखील जारी करण्यात आलाय.

काम असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावं, असं आवाहन करण्यात आलं आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज रविवारी (१४ जुलै) अनेक जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची (Maharashtra Heavy Rain) शक्यता आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे.

तर मुंबई, पुण्यासह, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे.या जिल्ह्यांत बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची अंदाज वर्तवण्यात आला आहे. पश्चिम घाटाच्या परिसरातही पावसाचा जोर (Maharashtra Rain News) वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदूरबार वगळून सर्व जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. पुढील ४ दिवस राज्यात पावसाची अशीच परिस्थिती राहणार, असंही सांगण्यात आलं आहे.

सध्या गुजरातच्या किनारपट्टीपासून केरळच्या किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालं आहे. त्यामुळे मुंबईसह कोकणात आणि सह्याद्रीच्या घाट माथ्यावर मुसळधार पाऊस होत आहे. रबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे पश्चिम घाट ओलांडून मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: डोंबिवलीत पुलावर लटकून तरुणाचा गोंधळ; नागरिकांच्या धाडसामुळे टळली दुर्घटना

Dombivli Water Cut : डोंबिवलीत सलग ३६ तास पाणी बंद; MIDC कार्यालयावर नागरिकांची धडक

Martyred Policemen: शहीद पोलिसांच्या कुटुंबीयांना मिळणार २ कोटींची मदत, या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Daler Mehndi: 'गायक दलेर मेहंदी दारू पिऊन स्टेजवर आले'; त्या व्हायरल व्हिडिओने खळबळ, नेमकं प्रकरण काय?

ZP Election : दसऱ्यानंतर भाजपचा मास्टरस्ट्रोक, काँग्रेसच्या बालेकिल्यात ४० जणांनी हातात धरलं कमळ

SCROLL FOR NEXT