Maharashtra Rain Alert Saam TV
महाराष्ट्र

Weather Alert : महाराष्ट्रात आज पुन्हा पाऊस, 'या' भागात मेघगर्जनेसह बसणार; हवामान खात्याकडून अलर्ट

Maharashtra Weather Update 12 July 2024 : आज शुक्रवारी राज्यातील अनेक भागात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर हवामान खात्याने काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी केला आहे.

Satish Daud

मागील दोन ते तीन दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरात पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. मात्र, गुरुवारपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोर पकडला आहे. आज शुक्रवारी राज्यातील अनेक भागात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर हवामान खात्याने काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी केला आहे.

पावसासोबतच वादळी वारे वाहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, असं आवाहन करण्यात आलं आहे. हवामान खात्याने (IMD Rain Alert) जारी केलेल्या अंदाजानुसार, पुढील 2 दिवसात ईशान्य भारतात पावसाची शक्यता आहे.

आजपासून १५ जुलैपर्यंत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि किनारी कर्नाटकात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज आहे. मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. शुक्रवार आणि शनिवारी मुंबईत अतिमुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता आहे.

पुण्यासह कोकणातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाडा तसेच विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना देखील पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलाय. विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे मराठवाड्यातील जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव आणि परभणी जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे. दरम्यान, हवामान खात्याने आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश या राज्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशामध्ये हलका ते जोरदार पाऊस पडू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लासलगावचा कांदा आता दिल्लीच्या दिशेने रवाना

Blood pressure medicines: BP ची औषधं घेताय? मग या 7 चुका करणं आजच टाळा

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT