Maharashtra Rain Update Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Rain Update: रिपरिप बंद धोधो सुरू! राज्यात पुढचे दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

Weather Forecast For Maharashtra : कालपासून राज्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी बरसण्यास सुरुवात झाली आहे.

Ruchika Jadhav

IMD Rain Alert For Maharashtra:

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने राज्यात दडी मारली. मात्र महिन्याच्या शेवटी पाऊस पुन्हा हजेरी लावणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलं होतं. कालपासून राज्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी बरसण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे बळीराजा सुखावला आहे. पुढील २ दिवस मराठवाडा आणि विदर्भात पाऊस सर्वाधिक राहणार आहे.

विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच नागपूर आणि चंद्रपूरमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोकणात देखील पुढील दोन दिवस मुसळधार पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. पुढील चार दिवस पश्चिम हिमालयीन प्रदेशात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या सरी बरसू शकतात.

नागपूर जिल्ह्यातील उमरेड जवळचा मकरधोकडा तलाव देखील ओव्हरफ्लो झालाय. गेल्या दोन दिवसांपासून नागपूरसह परिसरात पावसाने हजेरी लावलीय. उमरेड परिसरात काल मुसळाधार पाऊस झालाय. त्यामुळे मकरधोकडा तलाव ओव्हरफ्लो झालाय. तलाव ओव्हरफ्लो झाल्याने पर्यटकांमध्ये उत्साह आहे. तलाव ओव्हरफ्लो झाल्याने, परिसरातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटलाय. विदर्भात पावसाचा १५ दिवसांचा खंड पडला होता. पण गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरु झाल्याने शेतकऱ्यांची चिंता दूर झालीय. कापूस, सोयाबीन आणि इतर खरीप पिकांना या पावसाचा फायदा होतोय.

तर दुसरीकडे काही ठिकाणी शेतीपिकाचे नुकसान झाले आहे. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या जवळपास सगळ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलाय. भंडारा जिल्ह्यात काल सायंकाळच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावलीये. पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहू लागलेत. मात्र याचा फटका मिरची पिकांना बसला आहे.

भंडारा तालुक्यातील गुंजेपार येथिल अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले आहे. त्यामुळे लागवड केलेल्या मिरची पिक खराब होण्याच्या मार्गावर असून परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : वसई विरार महापालिकेत दोन दिवस पाणीपुरवठा राहणार बंद

Shreya Ghoshal : कतरिना कैफचं 'ते' गाणं गायल्याचा श्रेया घोषालला आजही पश्चाताप, नेमकं कोणत्या कारणामुळे गायिका नाराज?

India Tourism : अरावली पर्वतरांगेत घडलाय इतिहास, 'हा' आहे मेवाडच्या पराक्रमाची साक्ष देणारा किल्ला

मराठमोळ्या निर्मात्याला बेदम मारहाण, मुंबईतील ऑफिसमध्ये घुसत बॅटने मारले,कलाविश्वात खळबळ

Shocking: नातवाने पिचकारीने रंग उडवला, आजीला राग अनावर; थेट उकळत पाणी अंगावर ओतलं, अंगावर काटा आणणारा VIDEO

SCROLL FOR NEXT