Rain News Today 3 October 2024 Saam TV
महाराष्ट्र

Weather Forecast : राज्यातील 'या' भागात पुन्हा पावसाचा इशारा; IMD कडून कोणकोणत्या जिल्ह्यांना अलर्ट? वाचा..

Maharashtra Rain Alert Today : बुधवारी राज्यातील काही भागात जोरदार पाऊस झाला. आज गुरुवारी (ता. ३) पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Satish Daud

आठवडाभर एकाच जागेवर मुक्काम केल्यानंतर मान्सूनने पुन्हा परतीचा प्रवास सुरु केला आहे. उत्तर भारतातील काही भागातून मान्सूनने काढता पाय घेतला आहे. परिणामी हवामानात मोठा बदल झाला असून काही भागात पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. बुधवारी राज्यातील काही भागात जोरदार पाऊस झाला. आज गुरुवारी (ता. ३) पुन्हा पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज मराठवाडा, विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. तर सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातही पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

अहमदनगर, पुणे, सातारा जिल्ह्यांतील तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गडगडाटी वादळ आणि ताशी 40-50 किमी ताशी वेगाने वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. रायगड आणि सांगली जिल्ह्याला देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

दुसरीकडे लातूर, धाराशिव, बीड, सोलापूर, छत्रपती संभाजी नगर, जालना, नाशिक, कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह 30-40 किमी प्रतितास वेगाने वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

राज्यातील इतर भागात ढगाळ वातावरण राहील, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. मान्सूनची चाल थबकल्यानंतर राज्यातील कमाल आणि किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे. अनेक जिल्ह्यातील तापमानाचा पारा 32 अंशाच्या पार गेला आहे. त्यामुळे नागरिकांना उन्हाचा चटका जाणवत आहे. अशातच पावसाचा इशारा देण्यात आल्याने उकाड्यापासून सुटका मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Silver Wearing Rules: 'या' ३ राशींसाठी चांदी आहे घातक; नशिबी येते दारिद्रय, 'राजाचा होतो रंक'

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गावर थेट घरात आणि हॉटेलमध्ये घुसली कार

Frequent urination: दिवसातून किती वेळा लघवीला जाणं नॉर्मल आहे?

धक्कादायक! रिव्हॉल्व्हर साफ करताना गोळी सुटली; पोलीस उपअधीक्षक योगेश यांचा मृत्यू, पोलीस दलात खळबळ

Sunetra Pawar: अजितदादांच्या निधनाबद्दल माझ्या मनात शंका: सुनेत्रा पवार

SCROLL FOR NEXT