Rain  SaamTv
महाराष्ट्र

Rain Forecast: राज्यात या ठिकाणी 27 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान पावसाचा अंदाज

राज्यातील काही भागात जानेवारी अखेर हलक्या पावसाचा अंदाज IMDने वर्तवला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Rain Forecast in state: मागील काही दिवसांपासून राज्यात थंडीचं प्रमाण वाढलं आहे. आता थंडीनंतर राज्यात पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे. राज्यातील काही भागात जानेवारी अखेर हलक्या पावसाचा अंदाज IMDने वर्तवला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात 27 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान मराठवाडा, विदर्भ व परिसरात हलका आणि मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. येत्या 25 जानेवारीपासून अनेक भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. (Weather Update)

उत्तर-पश्चिम भारतात सक्रिय असलेल्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम संपूर्ण उत्तर भारतात दिसत आहे. एकीकडे मैदानी भागात थंडीपासून दिलासा मिळत आहे तर दुसरीकडे काही भागात बर्फवृष्टी सुरू आहे. यासोबतच सध्या हवामानात विशेष बदल होताना दिसत नाही.

उत्तर भारतात थंडीपासून नागरिकांना दिलासा मिळणार आहे. मात्र, यादरम्यान अनेक भागांत पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 22 जानेवारीनंतर म्हणजे आजपासून येथील हवामानात बदल होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party : एकनाथ खडसेंचा जावई अडकला की, अडकवला? पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात आता नवा ट्विस्ट

CPR Controversy : महिलेला CPR देणे शिक्षकाला पडलं महागात; चुकीच्या पद्धतीने हात लावल्याचा आरोप

Ladki Bahin Yojana : 'लाडकी'मुळे अर्थव्यवस्थेला खड्ड्यात? अर्धा कोटी लाडक्या बहिणींचा लाभ बंद?

Divya Deshmukh: 64 घरांची राणी वर्ल्डकप विजेत्या दिव्या देशमुखबद्दलच्या 'या' 10 गोष्टी जाणून घ्या

Raigad : डिश रिपेअरिंगसाठी घरात घुसले, सोन्याचे दागिन्यांकडे मन वळलं, नंतर अल्पवयीन तरुणांचं वृद्ध महिलेसोबत धक्कादायक कृत्य

SCROLL FOR NEXT