weather Alert Heavy Rain of Maharashtra Saam TV
महाराष्ट्र

Weather Alert : राज्यात पुढील ४८ तासांत पावसाचे; विदर्भ मराठवाड्यात मेघगर्जनेसह कोसळणार पाऊस, वाचा वेदर रिपोर्ट

Maharashtra Rain Alert : आज सोमवारपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

Satish Daud

राज्यातील विविध भागात सलग आठवडाभर पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसाचा शेतीपिकांना मोठा फायदा झाला. खरीप हंगामातील मका, कापूस, तसेच सोयाबिनचे पिक बहारल्याने बळीराजा सुखावला. सततच्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यातही समाधानकारक वाढ झाली. दरम्यान, मागील दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर आता राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

आज सोमवारपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाला (Maharashtra Rain News Today) सुरुवात होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. यापार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देखील जारी करण्यात आलाय. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह या जिल्ह्यांमधील विविध ठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय.

पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांतही मुसळधार पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट (Heavy Rain Alert Maharashtra) जारी करण्यात आलाय. कोल्हापूर जिल्ह्यातही अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आल्याने पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत आणखीच वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दुसरीकडे आज पुणे शहरासह जिल्ह्यातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. पुढील 2 दिवस मराठवाड्यात मुसळधार पावसाचे असतील. तर, विदर्भात देखील विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होईल, असा अंदाज वर्तवण्यात आलाय.

दरम्यान, भारतीय हवामान खात्याने आज विदर्भाला पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईसह उपनगरात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. अधूनमधून ४०-५० किमी ताशी वेगाने वारे वाहू शकतात. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs: 'या' 5 राशींना पावणार विठुराया; संकटं दूर होतील घरात येईल लक्ष्मी

Maharashtra Live News Update: CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पंढरपुरात आरोग्यवारी सोहळा

Boondi Ladoo Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी बुंदी लाडू

Nitesh Rane : विषय थेट अंतरपाटापर्यंत गेला, यांच्यामध्ये नवरदेव कोण अन् नवरी कोण? नितेश राणेंचा खोचक सवाल

Thackeray: पुष्पा ते लाडकी बहीण, मुंबईत ठाकरेंची तोफ धडाडली; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

SCROLL FOR NEXT