देवेंद्र फडणवीस  SaamTvnews
महाराष्ट्र

आपल्याला सत्ता हवीय, जनतेचे कल्याण करण्यासाठी - फडणवीस

भविष्यात काय होणार आहे याची चाहूल लागल्यामुळे आपले काही लोक पक्ष सोडून राष्ट्रवादीमध्ये (NCP) जात आहेत.

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली : आपल्याला सत्ता हवी आहे, ती घर भरण्यासाठी नाही, वसुलीसाठी नाही; तर सर्वसामान्यांचे कल्याण करण्यासाठी सत्ता हवी आहे. असे वक्तव्य राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले. ते सांगलीमध्ये (Sangli) नाना महाडिक पूर्णाकृती पुतळा अनावरण सोहळ्यादरम्यान बोलत होते.

हे देखील पहा :

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, येत्या काळामध्ये समाजाकरिता काम करायचे असून निवडणूक हारणे अथवा जिंकणे महत्वाचे नाही. जो समाजामध्ये राहून काम करतो त्याच्या पदरी नेहमीच यश येते. एखाद्या अपयशाने कोणीही मागे जात नाही. अपयशानंतरही जो समाजात जाऊन काम करतो समाज त्याचा पुरस्कार करतो.

भविष्यात काय होणार आहे याची चाहूल लागल्यामुळे आपले काही लोक पक्ष सोडून राष्ट्रवादीमध्ये (NCP) जात आहेत. मात्र, काहीही हरकत नाही कारण भाजपला (BJP) या वाळवा आणि शिराळा मतदार संघामध्ये थांबवणे आता कोणालाही शक्य नाही. सांगली जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व अधिक वाढवायचे असून त्यासाठीच आपले प्रयत्न सुरु असल्याचेही फडणवीस म्हणाले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अफगाणिस्तान-ताजिकिस्तान बॉर्डरवर भूकंप

Pune Crime : आधी कोयता दाखवून तरुणांनी नंगानाच केला, पोलिसांनी तासाभरात उतरवला सर्वांचा माज; गावभर काढली धिंड

२०२७ चा वर्ल्डकप खेळणार, ट्रॉफी जिंकणार; रोहित शर्माने मराठीत चिमुकल्या फॅन्सला दिलं आश्वासन

राज यांच्या गाडीत उद्धव ठाकरे, दुसऱ्या गाडीत आदित्य-अमित ठाकरे; दीपोत्सवात ठाकरे बंधू पुन्हा एकत्र|VIDEO

Raj Thackeray :...अन् राज ठाकरेंनी स्वत: हाती घेतलं कारचं 'स्टीअरिंग', दीपोत्सवातील ठाकरे बंधूंचा 'तो' व्हिडिओ चर्चेत

SCROLL FOR NEXT