Water Supply To Amravati And Badnera City Closed For Two Days Saam Tv
महाराष्ट्र

Amravati : पाईपलाईन दुरुस्तीसाठी अमरावती, बडनेरा शहराचा पाणीपुरवठा दोन दिवस बंद

Water Supply To Amravati And Badnera City Closed For Two Days : आज आणि म्हणजेच शुक्रवार ३ मे आणि शनिवार ४ मे असे दोन दिवस अमरावती आणि बडनेरा या दोन्ही शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमर घटारे

अमरावती: अमरावती (Amravati) आणि बडनेरा (Badnera) या दोन शहराला मोर्शी येथील अप्पर वर्धा धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र राहाटगाव जवळ काल (गुरुवारी) पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटल्याने या ठिकाणी लाखो लिटर पाणी वाया गेले. या मुख्य पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या वतीने आता हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे आज आणि म्हणजेच शुक्रवार ३ मे आणि शनिवार ४ मे असे दोन दिवस अमरावती आणि बडनेरा या दोन्ही शहराचा पाणीपुरवठा (Water Supply) बंद राहणार आहे अशी माहिती मजीप्राचे उपकार्यकारी अभियंता अजय लोखंडे यांनी दिली आहे. (Water supply to Amravati, Badnera city closed for two days for pipeline repairs)

हे देखील पाहा -

या मुख्य पाईपलाईनच्या दुरुस्तीच्या कामामुळे आज आणि उद्या दोन दिवस पाणी जपून वापरण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. मात्र यानिमित्ताने मजीप्राचा गलथान कारभार त्यानिमित्ताने चव्हाट्यावर आलेला आहेत. कारण शहरात तीव्र पाणी टंचाई असतांना पाईपलाईन फुटली, यात मोठ्या प्रमाणावर पाणी वाया गेलं, तर अमरावती शहरातील रहाटगाव जवळील वृंदावन अपार्टनमेंटजवळ पाईपलाईन फुटल्याने तलाव साचला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS : विराटसोबत ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच असं झालं, कुणाला विश्वासही बसणार नाही

Calcium Deficiency: शरीरात कॅल्शियम कमी असल्यास कोणती गंभीर लक्षणे दिसतात? जाणून घ्या

Thackeray Shivsena News : ठाकरेंच्या शिवसेना नेत्याला जीवे मारण्याची धमकी, गुंडाच्या त्या कृत्यामुळे कल्याणमध्ये संताप, वाचा नेमकं काय घडलं?

Shrutz Haasan Photos: कपाळी टिकली अन् कातील नजर, साऊथच्या अभिनेत्रीने केले तरूणांना घायाळ

पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला खिंडार; बड्या नेत्याची भाजपच्या दिशेनं वाटचाल, राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT