Mula Dam , Rahuri saam tv
महाराष्ट्र

मुळा नदी वाहतेय दुथडी भरून! धरण क्षेत्रात जमावबंदी, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

मुळा धरणाच्या पाणलोट आणि लाभक्षेत्रात कालपासून जोरदार पाऊस सुरू आहे.

साम टिव्ही ब्युरो

सचिन बनसोडे

शिर्डी : मुळा धरणाच्या पाणलोट आणि लाभक्षेत्रात कालपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मुळा धरणाकडे २१ हजार २२८ क्युसेक्सने पाण्याची आवक होत आहे. धरणाकडे पाण्याची होणारी आवक लक्षात घेता धरणाच्या ११ मोऱ्यांद्वारे १५ हजार क्युसेक्सने पाणी जायकवाडीकडे सोडण्यात आले आहे. तर मुळा नदी देखील दुथडी भरून वाहू लागली आहे. (water released from mula dam)

सध्या मुळा धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे. पूर परिस्थितीचे योग्य नियंत्रण सध्या धरणस्थळी करण्यात येत आहे. त्यामुळे धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने धरण परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. त्यामुळे पर्यटकांनी धरण परिसरात गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय, अशी माहिती मुळा धरण शाखेचे उप अभियंता शरद कांबळे यांनी दिली आहे.

दरम्यान, मुळा धरणासाठी मोजक्याच कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून कामकाज सुरू आहे. अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने मुळा धरण उपअभियंता शरद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्यांदाज राहुरी शाखा क्रमांक १,२,सोनई शाखा तसेच वांबोरी उपशाखा येथील कर्मचारी आठवड्यातून दोन दिवस २४ तास तैनात करण्यात आले आहेत.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपच्या तीन नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; काय आहे कारण? BJPच्या कारवाईनं राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: राजापूरमध्ये खाडीत बुडून एकाच कुटुंबातील चार मुलांचा मृत्यू; एका मुलीला वाचवण्यात यश

Rice vs Roti: भात की चपाती? वजन कमी करण्यासाठी रात्री जेवताना काय खावं

नवनियुक्त अध्यक्षांसमोरच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची हाणामारी; पक्ष कार्यालयातच एकमेकांवर भिरकावल्या चपला

October Heat Home Remedie: ऑक्टोबर हिटमुळे हैराण झालात? शरीर थंड ठेवण्यासाठी करा हे ७ सोपे घरगुती उपाय

SCROLL FOR NEXT