Maharashtra Water Crisis Saam TV
महाराष्ट्र

Water Crisis: राज्यावर भीषण पाणीटंचाईचं संकट, धरणांमध्ये केवळ इतकाच पाणीसाठा; अनेक शहरांत पाणीकपातीला सुरुवात

Maharashtra Water Crisis: राज्याच्या ६ विभागांतील धरणांतील पाणीसाठा ६६.३१ टक्क्यांवर घसरला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत त्यात २० टक्क्यांची घट झाली आहे.

Satish Daud

Water Crisis in Maharashtra

दरवर्षीच्या तुलनेत यंदा महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. ऐन पावसाळ्यात अनेक जिल्ह्यांकडे पावसाने पाठ फिरवली. परिणामी राज्यातील प्रमुख धरणांमध्ये कमी पाणीसाठा जमा झाला. त्यामुळे डिसेंबर महिन्यातच भीषण पाणीटंचाईचं संकट निर्माण झालं आहे.

राज्याच्या ६ विभागांतील धरणांतील पाणीसाठा ६६.३१ टक्क्यांवर घसरला आहे. गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात राज्यातील धरणांमध्ये ८७.१० टक्के इतका पाणीसाठा शिल्लक होता. त्यातुलनेत यंदा पाणीसाठा २० टक्क्यांनी कमी आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

डिसेंबर महिन्यातच काही धरणांनी निच्चांक पातळी गाठल्याने अनेक शहरांमध्ये पाणीकपातीला सुरुवात झाली आहे. राज्यातील पुणे, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि कोकण या ६ विभागांमध्ये २ हजार ५९५ लहान-मोठे धरणप्रकल्प आहेत.

या धरणांमधील पाणीसाठ्याचा वापर शेती, पिण्याचे पाणी आणि औद्योगिक कारण्यासाठी केला जतो. यंदा काही अपवाद वगळता बहुतांश धरणे १०० टक्के भरलीच नाहीत. त्यामुळे राज्यावर भीषण पाणीटंचाईचं संकट निर्माण झालं आहे.

सध्या राज्यातील कोकण विभागातील धरणांमध्ये सर्वाधिक ८२.६३ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी या विभागात याच वेळी ८३.१५ टक्के पाणीसाठा होता. दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर विभागात सध्या ३७.६३ टक्के एवढा राज्यातील नीचांकी पाणीसाठा आहे.

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात छत्रपती संभाजीनगर विभागात ८७.३१ टक्के पाणीसाठा होता. तर नागपूर विभागातील धरणांमध्ये सध्या ७१.७८ टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी तो ७९.४६ टक्के इतका होता. अमरावती गेल्या वर्षी ९१.५२ टक्के पाणीसाठा होता. यंदा तो ७५.६२ टक्के आहे.

मुंबई तसेच पुणे विभागातील पाणीसाठ्यातही लक्षणीय घट झाली आहे. गेल्यावर्षी पुणे विभागातविभागात ८८.०८ टक्के पाणीसाठा होता. यंदा तो ७०.३९ टक्के आहे. पुण्यापाठोपाठ नाशिक विभागातील पाणीसाठाही कमी झाला आहे. गेल्या वर्षीच्या ८९.८९ टक्क्यांच्या तुलनेत नाशिकमध्ये सध्या ७०.६१ टक्के पाणीसाठा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT