Samruddhi Mahamarg Accident: Saam tv
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघात सुरुच, सूरतला जाणाऱ्या रुग्णवाहिकेची कारला धडक; एकाचा मृत्यू

Samruddhi Mahamarg Accident: महामार्गावर रुग्णवाहिकेने कारला जोरदार धडक दिल्याने मोठ अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

Vishal Gangurde

मनोज जयस्वाल, वाशिम

Samruddhi Mahamarg Accident:

समृद्धी महामार्ग अपघातामुळे नेहमी चर्चेत असतो. या महामार्गावरील अपघातांची मालिका सुरुच असल्याचे दिसून येत आहे. या महामार्गावर पुन्हा एकदा अपघाताची भीषण घटना घडली आहे. महामार्गावर रुग्णवाहिकेने कारला जोरदार धडक दिल्याने मोठ अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील वनोजा ते कवरदरीच्या दरम्यान कार आणि रुग्णवाहिकेमध्ये भीषण अपघात झाला आहे.

रुग्णवाहिकेने कारला पाठी मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात एक जण ठार झाल्याची माहिती हाती आली आहे. तर 9 जण जखमी झाले आहेत. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघाताने घटनास्थळाच्या परिसरात एकच खळबळ उडाल्याचे दिसून आलं.

अपघात कसा झाला?

पुनीत नांदेलवार कुटुंबियांसमवेत नागपूरवरून मुंबईला कारने जात होते. तर वाशिम जिल्ह्यातील वनोजा ते कवरदरी दरम्यानच्या समृद्धी महामार्गावर नागपूरवरून सुरतला उपचारासाठी रुग्ण नेत असलेल्या भरधाव रुग्णवाहिकेने पाठीमागून कारला जोरदार धडक दिली.

या भीषण अपघातात रुग्णवाहिकेतील मोहिनी आभडे ठार झाल्या आहेत. तर कारमधील पुनीत नांदेवाल, शालू नांदेवाल, आरव नांदेवाल आणि पायल नांदेवाल असे 4 जण जखमी झाले आहेत. तर रुग्णवाहिकेमधील मोहनिश भोनेवाला, चालक प्रदीप कुमार बोहरा, सौम्या बोहरा, राकेश भोनेवाला आणि वीरेंद्र पाल हे 5 जण जखमी झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT