Crime News, washim Saam TV
महाराष्ट्र

Washim Crime News : महात्मा फुले चौकात राडा, गावठी कट्ट्यांमधून तीन राऊंड फायर; पाेलिस तपास सुरु

सुदैवाने या घटनेत काेणालाही गंभीर दुखापत झालेली नाही.

Siddharth Latkar

- मनोज जयस्वाल

Washim News : वाशिम येथील निमजगा परिसरात वादातून काहींनी एकमेकांवर गावठी देशी कट्ट्यांमधून तीन राऊंड फायर केले. ही घटना मंगळवारी रात्री घडली. या घटनेतील संशयितांचा तपास सुरु असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. (Maharashtra News)

वाशिमच्या महात्मा फुले चौकात जुन्या नात्या संबंधाच्या वादातून राग काढण्याच्या हेतूने निमजगा परिसरात दोघांनी दोघांवर एका देशी कट्ट्याने 3 राउंड फायर करत कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत काेणालाही गंभीर दुखापत झालेली नाही.

या घटनेत एकाला किरकोळ दुखापत झाली आहे. दरम्यान या प्रकरणी वाशिम पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा तपास वाशिम पोलिस करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून वाशिम जिल्ह्यात देशीकट्टे आणि कोयते, तलवारी सापडण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saam Impact: भ्रष्ट अधिकाऱ्यांना आता दे धक्का! 314 अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या रडारवर

Buldhana News: रस्त्यावरच महिलेची प्रसूती, मदतीसाठी कुणीच येईना; रुग्णालयाने नकार दिला, शेवटी...

रात्री झोपताना कंबर आणि पायाचा घोटा दुखतायत? तुमच्या दैनंदिन वापरातील 'ही' वस्तू ठरू शकते कारण

Maharashtra News Live Update: चितेगाव टोलनाक्याजवळ दोन कारची जोरदार धडक; जीवितहानी टळली

Crime: रायगड हादरले! १६ वर्षीय मुलीवर बलात्कार, मित्रानेच केलं भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT