Washim News Saam tv
महाराष्ट्र

Washim : पाणीटंचाईची दाहकता; टँकरच्या दरातही २०० रुपयांपर्यंत वाढ, ग्रामस्थांनी होतेय अडचण

Washim News : उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने बाष्पीभवनाचे प्रमाण वाढले आहे. याचा थेट परिणाम लहान- मोठ्या धरणांतील तसेच जलस्रोतांतील पाणी साठ्यावर झाला आहे. अनेक भागांत पाणीपुरवठा अपुरा पडतो आहे

Rajesh Sonwane

मनोज जयस्वाल 
वाशीम
: तापत्या उन्हामुळे जिल्ह्यातील पाणीसाठ्यावर प्रत्यक्ष परिणाम दिसून येतो आहे. विविध गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या उफाळून आली असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. मात्र मागील दहा दिवसांत पाच हजार लिटरच्या टँकरच्या दरात तब्बल १०० ते २०० रुपयांची वाढ झाली आहे. ज्यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला चांगलाच फटका बसत आहे.

तापमान वाढीसोबतच पाणी टंचाईची दाहकता देखील वाढत चालली आहे. ज्या गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या अधिक गडद आहे. उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याने बाष्पीभवनाचे प्रमाण वाढले आहे. याचा थेट परिणाम लहान- मोठ्या धरणांतील तसेच जलस्रोतांतील पाणी साठ्यावर झाला आहे. परिणामी, अनेक भागांत पाणीपुरवठा अपुरा पडतो आहे आणि पर्यायी व्यवस्था म्हणून नागरिकांना महागड्या दराने टँकरचे पाणी विकत घ्यावे लागत आहे.

ट्रॅकरच्या दरात करण्यात आली वाढ 

पाणीटंचाईची भीषणता ज्या गावांमध्ये अधिक प्रमाणात आहे; त्या ठिकाणी प्रशासनाकडून तात्पुरत्या उपाययोजना केल्या जात आहेत. तर काही ठिकाणी ग्रामस्थ स्वखर्चातून ट्रॅकरद्वारे पाणी मागवत आहेत. परंतु पाणी टंचाईची भीषणता अधिक होत असून पाण्याचे स्रोत देखील आटू लागले आहेत. यामुळे पाणी पुरवठा करणाऱ्या ट्रॅकर चालकांनी देखील एका फेरीमागे ट्रॅकरचे दर वाढविले आहेत. आता एका ट्रॅकर मागे १०० ते २०० रुपयांची वाढ झाली आहे. 

आगामी काळात आणखी दर वाढण्याची शक्यता 

दरम्यान स्थानिक प्रशासनाकडून पाणी टंचाईवर काही ठोस उपाययोजना अपेक्षित असताना त्या केल्या जात नसल्याचे चित्र आहे. यामुळे पुढील काही दिवसांत पाण्यासाठी अजून जास्त पैसे मोजावे लागतील अशी शक्यता आहे. नागरिकांत अस्वस्थता पसरली असून शासनाने वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. अर्थात वाढलेले ट्रॅकरचे दर जैसे ठेवून नागरिकांसाठी उपाययोजना हव्यात.  

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: प्रियांश-कॉनॉलीच्या वादळी खेळीपुढे लखनौ ढेर, पंजाब किंग्सच्या विजयाचा पंजा

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

SCROLL FOR NEXT