Washim News Saam tv
महाराष्ट्र

Washim News : तीन महिन्यांपासून गावातील पाणी पुरवठा बंद; संतप्त महिलांची जिल्हा परिषदेवर धडक

Washim News : वाशिम जिल्ह्यातील तामसाळा गावात जिल्हा परिषद अंतर्गत प्रधानमंत्री जल स्वराज्य प्रकल्प योजना टाकण्यात आली आहे. मात्र हि योजना बंद पडल्याने मागील तीन महिन्यापासून गावातील पाणी पुरवठा बंद झाला आहे

Rajesh Sonwane

मनोज जयस्वाल 
वाशीम
: पाणी पुरवठ्याचा प्रश्न गेल्या तीन महिन्यांपासून निर्माण झाला आहे. जिल्हा परिषद अंतर्गत येत असलेल्या या योजनेंतर्गत गावात पाणी मिळत नसल्याने संतप्त महिलांनी आज थेट जिल्हा परिषदवर धडक मोर्चा काढला. याठिकाणी गावातील पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. 

वाशिम (Washim News) जिल्ह्यातील तामसाळा गावात जिल्हा परिषद अंतर्गत प्रधानमंत्री जल स्वराज्य प्रकल्प योजना टाकण्यात आली आहे. मात्र हि योजना बंद पडल्याने मागील तीन महिन्यापासून गावातील पाणी पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळं गावातील महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत (Water Shortage) आहे. महिला व मुलांना लांबवरून डोक्यावर पाणी आणावे लागत आहे. याबाबत वारंवार ग्रामपंचायतकडे तक्रार देखील करण्यात आली आहे.  

पाण्याची समस्या तीन महिन्यांपासून भेडसावत असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही पाणीपुरवठा सुरू करण्यात आलेला नाही. यामुळे गावातील संतप्त महिलांनी आज थेट वाशिम जिल्हा परिषद गाठून जिल्हा परिषदेचे सीईओ वैभव वाघमारे यांना भेटून गावातील पाणी प्रश्न सोडविण्याची मागणी केली. याबाबत निवेदन देखील देण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी जळगावात नाशिकच्या विशेष पथकांची धडक

PM Kisan Yojana : पीएम किसानचा 24वा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरमध्ये खात्यात जमा होणार ₹2,000? जाणून घ्या मोठी अपडेट

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT