Washim News Saam tv
महाराष्ट्र

Washim : रस्ता दुरुस्तीसाठी ग्रामस्थांचे थेट पाण्यात उतरून आंदोलन; पाण्यातून बाहेर न निघण्याचा पवित्रा

Washim News : ईगल कंट्रक्शन कंपनी परिसरात रस्त्याचे काम करीत आहे. या रस्त्यासाठी परिसरातील अनेक भागातून खडक उत्खनन करून या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक केल्याने रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे

Rajesh Sonwane

मनोज जयस्वाल 
वाशिम
: वाशिमच्या मानोरा तालुक्यातील भोईनी फाटा ते मोहगव्हाण या ५ किलोमीटर रस्ता खराब झाला आहे. रस्ता दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने दुरुस्तीच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी पाण्यात उतरून जल आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत रस्ता दुरुस्तीचे आश्वासन मिळत नाही; तोपर्यंत बाहेर न निघण्याचा पवित्रा घेतला आहे. 

वाशीमच्या मानोरा तालुक्यातील भोईनी फाटा ते मोहगव्हाण दरम्यानच्या रस्ता दुरुस्तीची मागणी करण्यात येत आहे. यासाठी पारवा आणि मोहगव्हाण येथील नागरिक या आंदोलनात सहभागी झाले आहेत. ईगल कंट्रक्शन कंपनी परिसरात रस्त्याचे काम करीत आहे. या रस्त्यासाठी परिसरातील अनेक भागातून खडक उत्खनन करून या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक केल्याने रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे.

दरम्यान रस्त्यावरून जाताना गावकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वेळा अपघात सुद्धा झाले आहे. अनेक वेळा प्रशासनाकडे निवेदन देत मागणी करूनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे गावकऱ्यांनी थेट पाण्यात उतरून जल आंदोलन सुरू केला आहे. मागणी मान्य होत नाही; तोपर्यंत पाण्यातून बाहेर न निघण्याचा पवित्रा या आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे.

गंगाखेडमध्येही रस्त्यासाठी जलसमाधी आंदोलन
परभणी
: परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील खळी ते ब्रह्मनाथवाडी येथील मातोश्री पांदन रस्त्याचे काम मागच्या ३ वर्षांपासून अर्धवट अवस्थेत आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही उपयोग होत नसल्याने शेवटी गावकऱ्यांनी गावातच बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. उपोषणही दोन दिवस पार पडल्यानंतर प्रशासनाकडून दखल घेण्यात आली नसल्याने शेवटी आज गोदावरी नदीत खळी येथील ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन केले. यानंतर गंगाखेड पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी गावात येऊन रस्ता रविवारपर्यंत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर गावकऱ्यांनी आंदोलन स्थगित केले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एक गाडी, तीन मजली घर अन् पार्किंग चक्क गच्चीवर! बिहारचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

Maharashtra Drought Crisis: अर्ध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट; 19 जिल्ह्यातील 83 तालुक्यांना फटका

Political Leaders Retro Look: PM मोदी, राहुल गांधी ते उद्धव ठाकरेंपर्यंत...; नेत्यांचे फोटो 80sचा रेट्रो, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

'सरकारला जरांगे पाटलांना मारायचंय'; संजय राऊतांचा सरकारवर खळबळजनक आरोप

Maharashtra Politics: भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार भिडले; महालेंनी डिवचलं, गायकवाडांनी धमकावलं

SCROLL FOR NEXT