Washim News Saam tv
महाराष्ट्र

Washim : गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक; १२ किलो गांजा जप्त

Washim News : गुप्त माहितीच्या आधारे कारंजा-मंगरूळपीर रोडवर गस्त घालत होते. रात्री साधारण दीड वाजताच्या सुमारास दुचाकीवरून संशयास्पदरीत्या दोन व्यक्ती मंगरूळपीरकडे जाताना आढळून आले

Rajesh Sonwane

मनोज जयस्वाल 

वाशिम : गांजाची वाहतूक कारवाई केल्यानंतर देखील थांबत नसल्याचे पाहण्यास मिळत आहे. त्यानुसार वाशीम जिल्ह्यात देखील गांजा तस्करी पुन्हा एकदा उघड झाली आहे. वाशिमच्या स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करून अवैधरीत्या गांजा वाहतूक करणाऱ्या दोन व्यक्तींना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या जवळून १२ किलो गांजा आणि एक दुचाकी असा एकूण १ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

वाशीम जिल्ह्यातून गांजाची तस्करी केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुप्त माहितीच्या आधारे कारंजा-मंगरूळपीर रोडवर गस्त घालत होते. रात्री साधारण दीड वाजताच्या सुमारास दुचाकीवरून संशयास्पदरीत्या दोन व्यक्ती मंगरूळपीरकडे जाताना आढळून आले. यानंतर पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत त्यांच्या जवळील पिशवीची तपासणी केली असता, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गांजा आढळून आला. 

गांजासह दोघांना घेतले ताब्यात 

यानंतर पोलिसांनी या दोघानांही ताब्यात घेण्यात आले. यात ज्ञानेश्वर दयाराम मुखमले (वय २५, रा. गोगरी, ता. मंगरूळपीर) आणि कृष्ण ऊर्फ कुणाल गजानन पुसाडे (वय २१, रा. शेलू बाजार, ता. मंगरूळपीर) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या गांजाचे वजन १२ किलो असून त्याची किंमत १ लाख २० हजार रुपये एवढी आहे. दरम्यान त्यांची अधिक चौकशी पोलीस करत आहेत. 

दोघांविरुद्ध गुन्हा दाखल 

पोलिसांनी संशयितांकडील दुचाकीची किंमत ७० हजार रुपये असा एकूण १ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मंगरूळपीर पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सरू आहे. मात्र या कारवाईमुळे पुन्हा एकदा गांजा तस्करी उघड झाली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईत'हिट अँड रन'चा थरार! मध्यरात्री टँकरने डिलिव्हरी बॉयला चिरडले

Palghar Tourism : निसर्गाचा मनसोक्त आनंद घ्यायचाय; तर पावसाळ्यात पालघरमधील या ठिकांणाना नक्की भेट द्या

Maharashtra News Live Update: पुण्यातील कोंढवा परिसरात मोठी वाहतूक कोंडी

Mumbai Pune Missing Link: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर 2 महिन्यातच खड्डे; व्हिडीओ समोर आल्याने एकच खळबळ

Gold Rate Today: सोन्याची किंमत घसरली! प्रति तोळा सोनं ₹1,46,730 वर; वाचा २४k, २२k, १८k सोन्याचा आजचा भाव

SCROLL FOR NEXT