Washim News Saam tv
महाराष्ट्र

Washim News : तर भाजपचे काम करणार नाही; शिवसेनेचा भाजपला इशारा

Washim News : विधानसभा निवडणुकीत अनेक मतदारसंघात बंडखोरी झाली आहे. दरम्यान राज्यात वेगवेगळ्या मतदारसंघात बंडखोरी करणाऱ्या भाजपच्या ४० पदाधिकाऱ्यांवर भाजपने कारवाई केली आहे

Rajesh Sonwane

मनोज जयस्वाल 

वाशीम : एकीकडे भाजप बंडखोरांवर मोठ्या प्रमाणात कारवाई होत असताना दुसरीकडे वाशिमच्या रिसोड मतदारसंघात भाजपचे बंडखोर उमेदवारावर कारवाई करण्याची मागणी शिवसेना शिंदे गटाने केली आहे. असे न केल्यास दोन मतदारसंघात भाजपचे काम करणार नसल्याचा इशारा शिवसेनेने भाजपला दिला आहे.

विधानसभा निवडणुकीत अनेक मतदारसंघात बंडखोरी झाली आहे. दरम्यान राज्यात वेगवेगळ्या मतदारसंघात बंडखोरी करणाऱ्या भाजपच्या ४० पदाधिकाऱ्यांवर भाजपने कारवाई केली आहे. याच दरम्यान (Washim) वाशिमच्या रिसोड मतदारसंघात भाजपचे बंडखोर अनंतराव देशमुख यांच्यावर कारवाई न झाल्याने शिवसेनेच्या शिंदे गटाने कारवाई करण्याची मागणी केली. कारवाई न झाल्यास इतर दोन मतदारसंघात (BJP) भाजपचे काम करणार नसल्याचा इशारा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी वाशिम येथे पत्रकार परिषदेतून दिला आहे.

फडणवीसांनी भूमिका स्पष्ट करावी 
तसेच भाजपचे बंडखोर उमेदवार हे देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन प्रचार करत आहेत. त्यांच्या व्हिडिओ क्लिपचा वापर करत आहेत. या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनीच भूमिका स्पष्ट करावी; असेही आवाहन शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख महादेव ठाकरे आणि विजय खानजोडे यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MSRTC Card: एसटी प्रवाशांना दिलासा, NCMC कार्डच्या प्रक्रियेत मोठा बदल

Political News: मोठी बातमी! उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदेंना मोठा दिलासा, वसंत डावखरे प्रकरणात १७ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता

Maharashtra News Live Update: गणेश विसर्जनासाठी पुणे पोलिसाचा चोख बंदोबस्त

Food For Weight Loss: पोटाची चरबी कमी करण्यासाठी आहारात समावेश करा हे ७ पदार्थ; वजन होईल झपाट्याने कमी

Placenta percreta: मूत्राशयापर्यंत पोहोचली होती प्लॅसेंटा; प्रसूतीपूर्वीच धोका ओळखला, डॉक्टरांच्या मेहनतीने गर्भवती महिलेवर यशस्वी उपचार

SCROLL FOR NEXT