Poshan Aahar Saam tv
महाराष्ट्र

Poshan Aahar : शाळेच्या पोषण आहारातील चॉकलेट आढळले रस्त्यावर; वाशिममधील प्रकार

Washim News : सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना पोषक घटक मिळण्यासाठी शासनाने ज्वारी, बाजरी अशा धान्यापासून बनविलेले चॉकलेट देण्याची योजना काही दिवसांपासून सुरू केली

Rajesh Sonwane

मनोज जयस्वाल 
वाशीम
: शालेय विद्यार्थ्यांना अन्न घटकातील पोषणतत्व पुरविण्यासाठी शासनाने चॉकलेट देण्याची योजना सुरू केली आहे. या चॉकलेटमध्ये निकृष्टपणा तसेच अळ्या निघत असल्याच्या घटना घडत असतांना वाशिममध्ये या चॉकलेट पोत्यांमध्ये भरून रस्त्यावर फेकून दिल्याची घटना उघडकीस आली आहे.

सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना पोषक घटक मिळण्यासाठी शासनाने ज्वारी, बाजरी अशा धान्यापासून बनविलेले चॉकलेट (Poshan Aahar) देण्याची योजना काही दिवसांपासून सुरू केली आहे. या माध्यमातून वेगवेगळ्या फ्लेवरचे चॉकलेट विद्यार्थ्यांना दुपारच्यावेळी देण्यात येत असतात. विशिष्ट कंपनीने बनविलेले हे चॉकलेट शाळांवर पाठविले जातात. आणि शाळेवर विद्यार्थ्यांना वितरित केले जातात. मात्र बहुतेक वेळेस चॉकलेट खराब निघत असल्याचे समोर आले आहे. 

दरम्यान वाशिममध्ये (Washim) भर रस्त्यावर चॉकलेट फेकलेले आढळल्यामुळे शासनाच्या या योजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच अशाप्रकारे रस्त्यावर फेकून देणे कितपत योग्य आहे. कुणाच्या माध्यमातून हे चॉकलेट रस्त्यावर फेकण्यात आले. याची सखोल चौकशी होण्याची गरज निर्माण झाली आहे. सदर चॉकलेटची पाहणी केली असता त्याची एक्सपायरी डेट अजून संपलेली नसल्याचे दिसून आले.  तरी देखील अशाप्रकारे चॉकलेट फेकलेले आढळल्यामुळे पोषण आहाराच्या एकूणच प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पांढरे कपडे पुन्हा नव्यासारखे चमकवा! पिवळे डाग घालवण्यासाठी ‘या’ ५ स्मार्ट ट्रिक्स वापरा

Wardha: ग्रामसभेत दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी, गावकऱ्यांनी एकमेकांना धूधू धुतलं; व्हिडीओ व्हायरल

Maharashtra News Live Update: ओबीसी बांधव जात पडताळणी कार्यालयात; बोगस कुणबी प्रमाणपत्र देऊ नका

जात जिंकली, प्रेम हारलं! घरच्यांच्या विरोधाला कंटाळून तरुण-तरुणीचे टोकाचे पाऊल, तलावात आढळले मृतदेह अन्...

Housing Society Rules: हाउसिंग सोसायटीत नियम मोडला तर दंड कोणाला लागतो? घरमालक की भाडेकरू?

SCROLL FOR NEXT