Prakash Ambedkar Saam TV
महाराष्ट्र

Prakash Ambedkar: मराठ्यांना आरक्षण पाहिजे तर आम्हाला सत्ता द्या, प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

Prakash Ambedkar On Maratha Reservation: प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षणासंदर्भात वाशिममध्ये मोठं वक्तव्य केलं आहे. मराठ्यांना आरक्षण पाहिजे असेल तर आम्हाला सत्ता द्या, असे आवाहन त्यांनी मराठा समाजाला केले आहे.

Priya More

मनोज जैस्वाल, वाशिम

राज्यामध्ये मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा गाजत असताना यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मोठं वक्तव्य केले आहे. प्रकाश आंबेडकर बचाव यात्रेच्या माध्यमातून आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य करताना दिसत आहे. आज त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात वाशिममध्ये मोठं वक्तव्य केलं आहे. मराठ्यांना आरक्षण पाहिजे असेल तर आम्हाला सत्ता द्या, असे आवाहन त्यांनी मराठा समाजाला केले आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की, 'मराठ्यांना ओबीसीमधून आधीच १० टक्के आरक्षण दिले गेले आहे. मनोज जरांगे यांचा अल्टिमेटम सरकारला दिलेला आहे. त्याबद्दलची भूमिका सरकारने जाहीर करावी. मनोज जरांगे पाटीलची मागणी यापूर्वीच मान्य झाली आहे. गरीब मराठ्यांना आरक्षण हवं असेल तर त्यांनी आम्हाला सत्ता द्यावी. त्यांना आरक्षण कसे द्यायचे आणि त्यांचं ताट कसं वेगळं ठेवायचं याचा फार्मूला आमच्याकडे आहे. जोपर्यंत आम्हाला सत्ता देणार नाही तोपर्यंत आम्ही हा फार्मूला सांगणार नाही.'

मराठा कुणबी समाजाला मतदान करू नका, असं खळबळजनक वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी वाशिमच्या पोहरादेवी येथे हे खळबळजनक वक्तव्य केले. या निवडणुकीत कुणबी मराठा उमेदवाराला मतदान करू नका, असं त्यांनी ओबीसींना आवाहन केलंय. विधानसभेत ठरावाच्या वेळी कुणबी समाजाची पाटीलकी जागी झाली तर ते आपल्या बाजूने मतदान करणार नाहीत. त्यामुळे यापुढे ओबीसींनी कुणबी सोडून इतर ओबीसी उमेदवाराला मतदान केलं पाहिजे, असं वक्तव्य आरक्षण बचाव यात्रेनिमित्त त्यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT