Lumpy Disease  Saam tv
महाराष्ट्र

Lumpy Disease : वाशिम जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव; जनावरांचे बाजार भरविण्यावर बंदी

Washim news : पशु वैद्यकीय प्रशासन सतर्क झाले असून लम्पी आजार रोखण्यासाठी प्रशासनाकडून उपाय योजना आखण्यात येत आहेत. काही ठिकाणी बाधित जनावरांच्या वाहतुकीवर बंदी करण्यात आली आहे

Rajesh Sonwane

मनोज जयस्वाल 
वाशिम
: राज्यातील काही भागात जनावरांमध्ये लम्पी आजाराचा प्रादुर्भाव वाढल्याचे पाहण्यास मिळत आहे. यातच वाशिम जिल्ह्यातील देखील २० जनावरे लम्पी आजाराने बाधित झाली आहेत. या आजाराचा फैलाव रोखण्यासाठी गोवर्गीय पशुधनाचे खरेदी- विक्रीसाठीचे बाजार पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष योगेश कुंभेजकर यांनी दिले.

मागील काही दिवसांपासून जनावरांमध्ये लम्पी आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामध्ये काही जनावरांचा मृत्यू देखील झाला आहे. यामुळे पशु वैद्यकीय प्रशासन सतर्क झाले असून लम्पी आजार रोखण्यासाठी प्रशासनाकडून उपाय योजना आखण्यात येत आहेत. काही ठिकाणी बाधित जनावरांच्या वाहतुकीवर बंदी करण्यात आली आहे. तर काही ठिकाणी भरणारे बाजार देखील बंद करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. त्यानुसार वाशीम जिल्ह्यात बंदीचे आदेश काढले आहेत. 

लम्पी हा गोवर्गीय जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. लम्पी त्वचारोगांमध्ये जनावरांना ताप येणे, त्वचेखाली विशेषतः डोके, मान, पाय, कास आदी ठिकाणी गाठी येणे तसेच तोंडात, घशात व श्वसननलिका, फुप्फुसांत पुरळ व फोड येतात. दोन वर्षांपूर्वी म्हणजे २०२३ मध्ये जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला होता. यावेळी अनेक जनावरांचा मृत्यू देखील झाला होता. 

केवळ गोवर्गीय जनावरांच्या बाजारावर बंदी 
लम्पी चर्मरोग या संसर्गजन्य रोगाची लागण म्हैसवर्ग, शेळी व मेंढ्यांमध्ये होत नसल्याचा पशुसंवर्धन विभागाचा दावा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील म्हैसवर्गीय जनावरे, शेळ्या व मेंढ्यांचे खरेदी-विक्रीचे बाजार नेहमीप्रमाणे सुरू राहतील. मात्र गोवर्गीय बाजार भरविण्यावर बंदी करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद आहे. आतापर्यंत २० बाधित जनावरांवर उपचार करण्यात आल्याचे पशुसंवर्धन विभागाने स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Drought: शेतकऱ्यांना दिलासा! दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचा यादीत समावेश, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Tea Water for Hair: केसगळती कमी करुन केस होतील शायनी आणि घनदाट; केसांना लावा चहा पत्तीचं पाणी

World Heart Day: सतत गुडघेदुखीचा त्रास होतोय? हृदयासाठीही ठरू शकतो इशारा, जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

Maharashtra News Live Update: देशातून फरार असलेला निलेश घायवळ खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्त

Traffic E-Challan : ट्रॅफिक ई-चलन थकीत आहे? रस्त्यावरच गाडी जप्त होणार! जाणून घ्या सुप्रीम कोर्टाचे 'हे' १० कडक नियम

SCROLL FOR NEXT