Washim News Saam tv
महाराष्ट्र

Washim News : स्टंटबाजी करत अडाण नदीत उडी; पुरात वाहून गेलेल्या तरुणाचा ४८ तासानंतर लागला शोध

Washim News : शेलुबाजार येथील अडाण नदी दुथडी भरून वाहत आहे. या नदीवर असलेल्या पुलावरून वाहणाऱ्या पाण्यात अती उत्साहात स्टंटबाजी करत सागर प्रधान या युवकाने उडी मारली

Rajesh Sonwane

मनोज जयस्वाल 
वाशीम
: सर्वत्र पाऊस पडल्याने नदी नाल्यांना पूर आलेला आहे. या पुराच्या पाण्यात अनेकजण स्टंटबाजी करत असतात. परंतु हि स्टंटबाजी जीवावर बेतत असते. असाच प्रकार वॉशिंच्या शेलूबाजार येथे समोर आला असून नदीत उडी घेणारा हा तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेला होता. ४८ तासांनंतर या तरुणाचा मृतदेह सापडून आला आहे. 

सागर अरुण प्रधान (वय ३०) असे या तरुणाचे नाव आहे. (Washim) वाशीम जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला होता. यामुळे शेलुबाजार येथील अडाण नदी दुथडी भरून वाहत आहे. या नदीवर असलेल्या पुलावरून वाहणाऱ्या पाण्यात अती उत्साहात स्टंटबाजी करत सागर प्रधान या युवकाने उडी मारली. दरम्यान नदीच्या पाण्याचा वेग प्रचंड असल्यामुळे त्याला बाहेर निघता आले नाही आणि या प्रवाहात तो वाहून गेला होता. तेव्हापासून तो बेपत्ता होता. 

दोन दिवसांनंतर सापडला मृतदेह 

सदर प्रकार परिसरात माहित झाल्यानंतर येथे गर्दी जमली. मंगरूळपीर तहसीलचे तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तसेच पोलीस विभागाचे अधिकारी घटनास्थळावर दाखल झाले होते. यानंतर तरुणाचा शोध घेण्यास सुरवात करण्यात आली होती. मागील दोन दिवसांपासून युद्ध पातळीवर सागर प्रधान या युवकाचा नदीपात्रात शोध सुरू होता. मात्र अथक प्रयत्नांनंतर ४८ तासानंतर तरुणाचा मृतदेह संत गाडगेबाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाच्या हाती लागला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कुणबी नोंदींचा वाद पुन्हा पेटणार, 4 लोकप्रतिनिधींचे कुणबी प्रमाणपत्र अवैध

संजय शिरसाटांचं मंत्रिपद धोक्यात? इतर 3 मंत्र्यांवरही टांगती तलवार? मोठी खळबळ

राज्यात अ‍ॅनालॉग पनीरवर बंदी, ग्राहकांची कृत्रिम पनीरपासून सुटका

Maharashtra News Live Update: महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पाऊस, आयएमडीचा इशारा

Teacher Transfer : शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ; एकाच वेळी ३३ शिक्षकांवर निलंबनाची कारवाई, ६५ शिक्षकांची वेतनवाढ रोखली

SCROLL FOR NEXT