Washim Heavy Rain Saam tv
महाराष्ट्र

Washim Heavy Rain : वाशिम जिल्ह्यात मुसळधार; बाजार समितीमधील शेतमाल पाण्यात गेला वाहून, माल भरण्यासाठी शेतकऱ्याची धावपळ

Washim News : राज्यात मागील आठवडाभरापासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होत आहे. यातच हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मागील चार दिवसापासून वाशीम जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरू आहे

Rajesh Sonwane

मनोज जयस्वाल 
वाशीम
: राज्यात सध्या अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. ठिकठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होत असून बाजार समितीमध्ये ठेवलेल्या मालाचे देखील नुकसान होत आहे. दरम्यान मुसळधार पावसामुळे वाशिमच्या मानोरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्याचा शेतमाल पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याचा प्रकार घडला आहे. वाहून जाणारा माल भरण्यासाठी शेतकरी जीवाचा आकांत करून प्रयत्न करत आहे. 

राज्यात मागील आठवडाभरापासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होत आहे. यातच हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मागील चार दिवसापासून वाशीम जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरू आहे. असे असताना कृषी उत्पन्न बाजार समितीकडून शेतकऱ्याच्या शेतमालाची काळजी घेणे गरजेचे असतानाही व्यापाऱ्याने माल ओट्यावर ठेवल्यामुळे शेतकऱ्यांचा शेतमाल बाहेर ठेवावा लागला होता. याचे पावसामुळे नुकसान होत आहे. 

शेतमाल गेला वाहून 
दरम्यान आज दुपारच्या सुमारास वाशीम जिल्ह्यात पावसाला सुरवात झाली. मुसळधार पावसाला सुरूवात झाल्यानंतर काही क्षणातच बाजार समितीच्या आवारातून पाणी वाहू लागल्याने यासोबत शेतमाल देखील वाहू लागला. यामुळे शेतकऱ्यांची धावपळ बघायला मिळाली. आपला शेतमाल डोळ्यासमोर पाण्यात वाहून गेल्यान शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.

अमरावतीमध्ये मुसळधार अवकाळी पावसाला सुरुवात
अमरावती शहर व परिसरात दुपारच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरवात झाली. तर पुढील तीन दिवस विदर्भात ढगाळ वातावरण आणि पावसाचा हवामान खात्याने अंदाज दर्शविला आहे. त्यानुसार पावसाचे आगमन झाले आहे. अवकाळी पावसामुळे कांदा आणि संत्रा बागांना फटका बसण्याची मोठी शक्यता निर्माण झाली असून अवकाळी पावसाने उन्हाळी मशागतीच्या कामांना देखील ब्रेक लागला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

Maharashtra News Live Update: दहीहंडीत अश्लील नृत्य; डान्सर निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

SCROLL FOR NEXT