Washim Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Washim crime : नातू बनला कर्दनकाळ! आजी-आजोबांना संपवलं, मृतदेह धरणात फेकला; नेमकं काय घडलं?

Priya More

मनोज जैसवाल, वाशिम

वाशिममध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. नातवानेच आपल्या आजोबांची हत्या करत त्यांचा मृतदेह धरणामध्ये फेकून दिला. वाशिमच्या मानोरामध्ये ही धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे वाशिममध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी नातवासह चार जणांना अटक केली आहे. वाशिम पोलिसांकडून याप्रकरणाचा कसून तपास सुरू आहे. संपत्तीच्या वादातून हे हत्याकांड झाल्याचे बोलले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाशिमच्या मानोरा तालुक्यातील इंझोरी येथील अडान धरणामध्ये एका ७० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. मंगळवारी ६ ऑगस्टला दुपारी धरणामध्ये मृतदेह पाहिल्यानंतर गावकऱ्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत तपास सुरू केला. तर हा मृतदेह मानोरा येथील प्रल्हाद वीर यांचा असल्याचे निष्पन्न झालं होतं.

त्यानंतर पोलिसांनी प्रल्हाद वीर यांच्या घरी जाऊन तपासणी केली असता घरात रक्ताचे डाग आढळून आले. प्रल्हाद वीर त्यांची पत्नी देखील बेपत्ता असल्याची बाब समोर आली होती. पोलिसांनी या घटनेचा तपास करत असताना शेजारील घराचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर त्यामध्ये प्रल्हाद वीर यांच्यासह ४ जण दिसले. त्यानंतर पोलिसांनी या चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. त्यांची चौकशी केली असता त्यांनी हत्येची कबुली दिली.

प्रतीक संतोष वीर, विकास भगत, जगदीश अनिल देवकर, जीवन फडके असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आजोबांचा मृतदेह अडान धरणात सापडल्यानंतर आजीही बेपत्ता असल्याची बाब समोर आल्यानंतर आजीलाही मारून अडान धरणात फेकल असावे अशी शक्यता पोलिसांना वाटत आहे. त्यामुळे पोलिस आणि आपत्कालीन पथकाने अडान धरणात शोध कार्य सुरू केले आहे. संपत्तीच्या वादातून ही हत्या झाल्याची शक्यता वर्तविली जात असून पुढील तपास मानोरा पोलिस करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sambhajinagar Corporation : पाणी पुरवठ्यासाठी करणार सौरऊर्जेचा वापर; शंभर एकर जागेवर संभाजीनगर महापालिका उभारणार प्रकल्प

Maggi Dosa Recipe : मुलांना टिफीनमध्ये द्या झटपट बनवलेला मॅगी डोसा; वाचा 5 मिनिटांत तयार होणारी रेसिपी

Maharashtra News Live Updates: पंतप्रधान मोदींचा आज वर्धा दौरा; असा असेल कार्यक्रम...

Palghar Crime: निर्मात्याकडून अश्लील मेसेज अन् छेडछाड; २६ वर्षीय अभिनेत्रीची पोलिसात तक्रार, मुंबईमधील धक्कादायक प्रकार

Bigg Boss Marathi : संग्रामला टोला, अरबाजचं तोंडभरून कौतुक; उत्कर्ष शिंदे काय म्हणाला ?

SCROLL FOR NEXT