Washim Accident  Saam Tv
महाराष्ट्र

Washim Accident: समृद्धी महामार्गावर ट्रक-कारमध्ये भीषण अपघात, बाप-लेकाचा जागीच मृत्यू

Truck And Car Accident In Washim: ट्रकमध्ये बिघाड झाल्यामुळे चालकाने महामार्गावर कडेला ट्रक उभा केला होता. याचवेळी पाठीमागून आलेल्या भरधाव कारने ट्रकला जोरदार धडक दिली.

Priya More

मनोज जैस्वाल, वाशिम

समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघाताची घटना घडली आहे. वाशिममध्ये महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला कारने धडक दिली. या भीषण अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामध्ये ३ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये वडील आणि मुलाचा समावेश आहे. हा अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाशिममध्ये समृद्धी महामार्गावर सकाळी ११.४५ वाजता भीषण अपघात झाला. ट्रकमध्ये बिघाड झाल्यामुळे चालकाने महामार्गावर कडेला ट्रक उभा केला होता. याचवेळी पाठीमागून आलेल्या भरधाव कारने ट्रकला जोरदार धडक दिली. वाशिमच्या मंगरूळपीर तालुक्यातील लोकेशन २१८ वर हा अपघात झाला. या अपघातामध्ये कारमधील दोघांचा मृत्यू झाला तर तिघे जखमी झाले.

अपघातामध्ये ४५ वर्षीय वडील आणि ७ वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर तिघे जण जखमी झाले असून यामध्ये २ महिला आणि एका पुरूषाचा समावेश आहे. अपघातग्रस्त कार नागपूरवरून मुंबईच्या दिशेने जात होती. अपघातामध्ये कारचा अक्षरश: चक्काचूर झाला. अपघाताची माहिती मिळताच वाशिम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कारचा पुढील भाग कापून त्यानंतर मृतदेह आणि जखमींना बाहेर काढण्यात आले. जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

या अपघातामध्ये दिपाली पराग सोनार ( ४० वर्षे) आणि त्यांची मुलगी रुजुल पराग सोनार (१७ वर्षे) हे जखमी झाले आहेत. त्यांना शेलू बाजार येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. प्रथम उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे हलवण्यात आले आहे. या अपघातामध्ये पराग सोनार (४४ वर्षे) आणि त्यांचा मुलगा अनुश पराग सोनार यांचा मृत्यू झाला आहे. हे सर्वजण एकचा कुटुंबातील असून ते नवी मुंबई येथे राहत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT