Washim Crime News  Saam Tv
महाराष्ट्र

Washim Crime: झटपट श्रीमंत होण्यासाठी तरुणांनी केलं कांड, १० वाहनं चोरली; कारनामे ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

Washim Police: वाशिममध्ये ४ अट्टल गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्हेगारांनी झटपट श्रीमंत होण्यासाठी जेसीबीसह १० वाहनांची चोरी केली होती. या घटनेचा तपास वाशिम पोलिस करत आहेत.

Priya More

मनोज जैस्वाल, वाशिम

वाशिममध्ये झटपट श्रीमंत होण्यासाठी तरुण चोरी करत होते. श्रीमंत होण्याच्या नादात तरुणांनी ७ दुचाकी, २ ट्रॅक्टर आणि १ जेसीबीची चोरी केली होती. या ४ अट्टल गुन्हेगाराच्या टोळीला वाशिम शहर पोलिसांनी जेरबंद केले आहे. या चोरांकडून पोलिसांनी ४० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सध्या वाशिम पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

झटपट श्रीमंत होण्याच्या नादात ४ तरुणांनी आधी जेसीबी चोरला असं करत त्यांनी एकापाठोपाठ तब्बल १० वाहनं चोरली. श्रीमंत होण्यासाठी ४ तरुणांनी हा चोरीचा मार्ग स्वीकारला. आधी तरुणांनी जेसीबी चोरी करून नदीतून रेती काढण्याचे काम सुरू केले. त्यानंतर रेती वाहतूक करण्यासाठी २ ट्रॅक्टर चोरी केले. त्यानंतर या ट्रॅक्टरला डिझेल पुरवण्यासाठी एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल ७ दुचाकी चोरांनी लंपास केल्या.

चोरीच्या घटनांचा तपास करत असताना गुन्हेगारांची ही टोळी वाशिम पोलिसांच्या हाती लागली. या टोळीकडून पोलिसांनी तब्बल ४० लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल वाशिम शहर पोलिसांनी जप्त केला आहे. वाशिम जिल्ह्यातील दोन दुचाकी आणि दोन ट्रॅक्टरचा शोध घेत असताना ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. चारही गुन्हेगारांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. हे सर्व आरोपी तरुण यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यातील आहेत.

सुखदेव ऊर्फ संचीत गायकवाड (वय २८ वर्षे), नामदेव उत्तम गायकवाड, ज्ञानेश्वर बंडु कछवे, महादेव बबन पाटील या चार आरोपींना पोलिसांनी अटक केली. यामधील सुखदेव आणि नामदेव हे यवतमाळच्या महागांव तालुक्यातील करंजी गावात राहणारे आहेत. तर ज्ञानेश्वर हा वाशिम जिल्ह्यातल्या ब्राम्हणवाडा येथे राहणारा आहे. तर महादेव पाटील वाशिम येथील हॅपी फेसेस शाळेजवळ राहणारा आहे. वाशिम शहर पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डिलिमिटेशन बिलासाठी खासदारांचा भाव 150 कोटी; राऊतांचा भाजपवर खळबळजनक आरोप

मामाच्या मुलीशी लग्नावर बंदी येणार? नातेवाइकांमधील विवाह रोखण्यासाठी नवा कायदा?

Maharashtra News Live Update: चाकणमध्ये बेशिस्त वाहतुकीचा फटका; पुणे-नाशिक महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

ते एक वर्षभरापूर्वीचं वक्तव्य अन् सोने-चांदीचा भाव गडगडला; PM नरेंद्र मोदींनी सांगितलं नेमकं कारण

बारामतीत गोळीबाराचा थरार! आलिशान कारमधून आलेल्या उद्योजकावर धडाधड गोळ्या झाडल्या

SCROLL FOR NEXT