Washim Crime News Saam TV
महाराष्ट्र

Washim Crime News: मामाच्या पोरीवर जीव जडला, लग्नाचं वचन देत फार्महाऊसवर नेलं; तरुणाच्या कृत्याने खळबळ

Washim Crime: वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात ही संतापजनक घटना घडली. याप्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

मनोज जयस्वाल, साम टीव्ही

Washim Latest Marathi News: तरुणाचा मामाच्या पोरीवर जीव जडला, तिला प्रेमाच्या जाळ्यातही फसवलं. गोड बोलून फिरायला जायचा बहाणा केला. त्यानंतर लग्नाचे वचन देत तिला एका गेस्टहाऊसवर नेलं. तिथे तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. याबाबत कुणाकडे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. (Latest Marathi News)

वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात ही संतापजनक घटना घडली. याप्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी (Police) आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तरुणाने मामाच्याच पोरीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याची घटना समोर येताच परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ वर्षीय पीडित तरुणी ही मालेगाव (Washim News) तालुक्यात राहणाऱ्या आरोपीच्या मामाची मुलगी आहे. जवळचे नातेसंबंध असल्याने त्यांची ओळख होती. आरोपीने पीडितेचा मोबाइल नंबर सुद्धा घेतला होता. त्यामुळे अधून-मधून त्यांच्यात बोलणे सुरू होते.

दरम्यान, आरोपीने ओळखीचा फायदा घेत तरुणीसोबत (Crime News) जवळीक वाढवली. त्याने भेटण्याचा बहाणा करून पीडितेला शेगाव येथील गणेश गेस्टहाऊसमध्ये बोलावून घेतले. आरोपीने पीडितेला लग्नाचे वचन देत तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

यानंतर पीडितेने आरोपीकडे लग्नाची मागणी घातली असता, त्याने लग्न करण्यास नकार दिला. तसेच याबाबत कुणाकडे वाच्यता केल्यास पीडितेला जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली. या संपूर्ण प्रकारामुळे पीडिता प्रचंड घाबरली. तिने तातडीने पोलिसांत धाव घेतली.

दरम्यान, पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, मालेगाव पोलिसांनी आरोपीविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच पीडित तरुणीची वैद्यकीय चाचणी सुद्धा करण्यात आली आहे. तरुणाने मामाच्याच मुलीवर अत्याचार केल्याचं समोर येताच परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे मुंबईकडे रवाना

गणपतीच्या नैवेद्यासाठी केळीचे पानच का वापरतात? वाचा धार्मिक महत्व

Shocking : रात्री गाढ झोपेत होत्याचं नव्हतं झालं, एकाच कुटुंबातील ४ महिला आगीत होरपळल्या

Gram Panchayat Elections: महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुका कधीपर्यंत होणार? संभाव्य तारखा आल्या समोर

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या ३ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, 'वीकेंड का वार'ला कोण जाणार घराबाहेर?

SCROLL FOR NEXT