wardha flood  saam tv
महाराष्ट्र

Wardha Flood : ...अन् पुराच्या पाण्यात होत्याचं नव्हतं झालं; पूरग्रस्त महिलेने व्यक्त केल्या भावना

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. वर्धा जिल्ह्याला तर पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

अमर घटारे

वर्धा : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. वर्धा जिल्ह्याला तर पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. वर्धा जिल्ह्यातील (Wardha) अनेक गावातील लोकांच्या घरात पाणी शिरलं. वर्धा जिल्हात पूर (Flood) परिस्थिती निर्माण झाल्यावर अनेक गावं पुराच्या पाण्याखाली गेली. अनेक गावाचा संपर्क तुटला, यात घरांची पडझड झाली. दोन हातावर काबाड कष्ट करून आयुष्याची कमाई आपल्या स्वप्नातील घरावर खर्च केल्यानंतर एका पुराच्या पाण्यात होत्याच नव्हतं झालं, अशी भावना वर्ध्यातील पूरग्रस्त महिलेने व्यक्त केल्या. (Wardha Flood News In Marathi)

हिंगणघाट येथील महाकाल नगर येथील देवकी कहकुरे व त्यांचे पती यांनी काबाड कष्ट करून आयुष्याची कमाई घराला लावली. मात्र, काल आलेल्या पुरात घरातील सर्व साहित्य ओले झाले. घरातील अन्न धान्य, मुलांचे शैक्षणिक साहित्य,जीवनावश्यक वस्तू पूर्ण पाण्यात खराब झाल्या. घरातील संपूर्ण फर्निचर सुद्धा खराब झालं. त्या रात्री अचानक पुराचं पाणी घरात शिरलं, दोन लहान मुलांना खांद्यावर घेऊन देवकी कहकुरे यांचे पती निघाले.

त्यानंतर देवकीताईला घेण्यासाठी आले. तेव्हा घरात ५ फुटाच्या वर पाणी आलं होतं. आपल्या डोळ्यासमोर घरातील साहित्यांची नासधूस होताना त्यांनी आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिलं, अशी पूर परिस्थिती देवकी कहकुरे यांनी माध्यमांशी व्यक्त केली. देवकीताईच्या माध्यमांशी बोलताना डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते.

वर्धा जिल्ह्यात एक लाख हेक्टरच्यावर शेती पाण्याखाली

वर्धा जिल्ह्यात यशोदा, वना ,वर्धा या नदीला पूर आल्यामुळे जिल्ह्यातील 41 गावांचा संपर्क तुटला होता. यामध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण शेती पाण्याखाली गेली होती .चहूबाजूने पाणीच पाणी दिसून येत आहे.जिल्ह्यात 211 मिलिमीटर पाऊस झाल्यामुळे वर्धा जिल्ह्यात 1 लाख हेक्टरच्या वर शेती पाण्याखाली गेली आहे. सोयाबीन,तूर, कापूस हे संपूर्ण पिके पुराच्या पाण्यााखाली आल्याने लाखो रुपये खर्च करुन पेरणी केलेली शेती वाया गेली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांना सरकार देतेय पेन्शन; किती मिळतात पैसे, काय आहे अर्ज प्रक्रिया?

सांगलीत सापडली पेट्रोलची विहीर? राज्यात आता पेट्रोल स्वस्त होणार?

Cricket Rule : नवख्यांपासून दिग्गज खेळाडूंपर्यंत...सगळ्याच क्रिकेटपटूंचं टेन्शन वाढणार; BCCI लागू करणार नवा नियम

Healthy Breakfast : रोज एकच नाश्ता खाणाऱ्यांनो सावधान! या 6 गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करू नका

यंदाही गणेशोत्सवात कोकणवासीयांचे हाल, मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT