wardha police seized rs 1 lakh banned tobacco arrests one saam tv
महाराष्ट्र

Wardha : सिद्धार्थनगर परिसरात पाेलिसांचा छापा, प्रतिबंधित तंबाखूसाठ्यासह लाखांचा मुद्देमाल जप्त; एकास अटक

ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.

Siddharth Latkar

- चेतन व्यास

Wardha Crime News :

प्रतिबंधीत असलेल्या सुगंधीत तंबाखूची खुलेआम विक्री करीत असल्याची माहिती वर्धा पोलिस (wardha police) दलास मिळाली होती. त्यानूसार पोलिसांनी बोरगाव मेघे येथील सिद्धार्थनगर परिसरात छापा मारुन संशयित आराेपीस सुगंधीत तंबाखूची विक्री करताना रंगेहात पकडले आणि अटक केली. संबंधिताकडून खर्रा तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चार इलेक्ट्रीक मशीन्स, मोबाईल असा एकूण १ लाख १ हजार १६६ रुपयांचा तंबाखूसाठा जप्त केला. (Maharashtra News)

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिलेल्या माहितीनूसार अमीर खान हमीद खान पठाण (वय ३४ रा. सिद्धार्थनगर बोरगाव मेघे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी शंकर किराणा स्टोअर्सचा मालक शंकर सेठ घरा. पांढूर्णा मध्यप्रदेश) याचा शाेध सुरु आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अमीर खान हमीद खान पठाण हा त्याच्या राहत्या घरी प्रतिबंधीत असलेला सुगंधित तंबाखू, तंबाखू मिश्रीत खर्रा तयार करुन विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी याची माहिती अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना दिली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलिसांनी आरोपीच्या राहत्या घरी छापा मारला. घर तपासणीत सुगंधित तंबाखूसाठा आढळून आला. पोलिसांनी आरोपीकडून मोबाईल व तंबाखूसाठा असा एक लाखांचा मुद्देमाल जप्त करीत बेड्या ठोकल्या. तंबाखूसाठा हा पांढूर्णा येथील रहिवासी शंकर सेठ याच्याकडून आणल्याचे त्याने सांगितल्याने पोलिसांनी त्याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक अमोल लगड, चंद्रकांत बुरंगे, अरविंद येणुरकर, मनीष कांबळे, भूषण निघोट,महादेव सानप, शिवकुमार परदेशी, गजानन दरणे यांनी केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Monorail : मुंबईत मोनो रेल अडीच तासांपासून विस्कळीत; तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांचे हाल|VIDEO

Pandharpur Crime : पंढरपूर हादरले; पत्नीला कलाकेंद्रात नाचायला पाठवलं, दिराने केली भावजयीची हत्या

Deleted Messages : महत्वाचा मेसेज डिलीट झाल्यास १ सेंकदात करा रिकव्हर

Maharashtra Live News Update : कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ...

Shocking: पंढरपुरात वारीला जाऊन आला अन् घरात येऊन आयुष्य संपवलं; खिशात सापडली 'ही' गोष्ट

SCROLL FOR NEXT