Wardha police arrested thieves saam tv
महाराष्ट्र

गॅस कटरने ATM मशीन फोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास, पोलिसांनी केली चोरट्यांच्या टोळीला अटक

एटीएम मशिन गॅस कटरने कापून २३ लाख ७८ हजार ८०० रुपयांची रक्कम चोरट्यांनी लंपास केली, त्यानंतर...

साम टिव्ही ब्युरो

चेतन व्यास

वर्धा : जिल्ह्याच्या वायगावात चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय. या गावातील एटीएम मशिन गॅस कटरने कापून २३ लाख ७८ हजार ८०० रुपयांची रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यानंतर या चोरट्यांनी बोरगावातील (ATM) एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ही चोरट्यांची टोळी घटनास्थळावरून पसार झाली होती. परंतु, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी (Police) चोरट्यांचा टोळीचा पर्दाफाश करत तेलंगणा राज्यातील निजामाबाद येथून आरोपींना अटक केली.

साबीर लियाकत खान (२५), अन्सार सुले खान (२६) इरफान शकुर शेख (३७), हाकाम शेर महम्मद शेख (२७) अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. या टोळीतील दोन चोरटे अद्यापही फरार आहेत. दरम्यान, अटक केलेल्या आरोपींना नऊ दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. (Wardha robbery crime latest update)

मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी २९ ऑगस्ट रोजी चोरीच्या वाहनांचा वापर करुन वायगाव येथील एसबीआय कंपनीचे एटीएम मशीन गॅस कटरने कापून तब्बल २३ लाख रुपये लंपास केले. तसेच या चोरट्यांनी बोरगावातही एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न करुन चोरटे पसार झाले होते. देवळी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईत सदर आरोपी तेलंगणा राज्यातील निजामाबाद येथे असल्याची माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जीवाची पर्वा न करता निजामाबाद जवळील खेडला नुहू मेवात ढाब्यावर छापा मारुन चारही आरोपींना अटक केली, अशी माहिती वर्ध्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक प्रशांत होळकर यांनी दिली.

पोलिसांनी आरोपींकडून ८ हजार ५०० रुपये रोख, चार मोबाईल, स्क्रू ड्रायव्हर, लोखंडी फायटर, तीन एटीएम कार्ड, दिल्ली पासींग वाहनांच्या दोन फेक नंबर प्लेट, वाहन डायरेक्ट करण्याची दोन हत्यारे, पांढऱ्या रंगाची कार असा एकूण ८ लाख ६९ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक केलेले आरोपी एटीएम कटींग करणारे अट्टल गुन्हेगार असून त्यांनी यापूर्वी राजस्थान, तेलंगणा, मध्यप्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र हरियाणा आदी राज्यात गुन्हे केले आहेत. सध्या हे सर्व आरोपी दिल्ली, पानिपत येथील एटीएम कटिंगच्या गुन्ह्यात फरार आहेत. यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे, अशीही माहिती होळकर यांनी दिली आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधी VVIP नाही..., लवकर सुनावणीच्या मागणीवरून सुप्रीम कोर्ट संतापले

Weight Loss Tips: दिवाळीपूर्वी करा १० किलो वजन कमी; ६० दिवसांच्या डाएटमध्ये 'या' पदार्थांचा करा समावेश

Maharashtra News Live Update: नागपूरात युवा काँग्रेसचा मोर्चा; आंदोलक आक्रमक

Woman swallows 13 pens: पोटदुखीमुळे रूग्णालयात पोहोचली महिला; स्कॅन पाहून डॉक्टरही हैराण, पोटातून डॉक्टरांनी काढले 13 पेन, 5 लाकडी चमचे, मेणबत्ती

Toll Free Pass : गणेशोत्सवासाठी टोल फ्री पास कसा मिळवायचा? एका क्लिकवर जाणून घ्या

SCROLL FOR NEXT