Pankaj Bhoyar Saam tv
महाराष्ट्र

Wardha : वर्धा जिल्ह्यात लवकरच पालकमंत्री हेल्पलाईन; पंकज भोयर यांची घोषणा

Wardha News : जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू करण्यात येत असलेल्या पालकमंत्री हेल्पलाइनच्या माध्यमातून नागरिकांचे फोन आल्यास तात्काळ त्यांच्या समस्याचे निराकारण प्रशासनाच्या माध्यमातून केले जाणार

Rajesh Sonwane

चेतन व्यास 
वर्धा
: सरकारी काम, महिनोन महिनो थांब अशी म्हण आहे; मात्र ही म्हण सत्यात उतरू नये याकरिता पालकमंत्री पंकज भोयर हे अभिनव उपक्रम सुरु करणार आहे. सामान्य नागरिकांच्या असलेल्या समस्या व त्यांना वेळेवर मदत व्हावी; याकरिता लवकरच पालकमंत्री हेल्पलाईन सुरु करणार असल्याची घोषणा पंकज भोयर यांनी केली आहे. यामुळे सरकारचे काम आणि प्रशासन कसे गतिमान आहे, हे दाखविण्यासाठी ही योजना महत्वाची ठरणार असल्याचे ते म्हणाले. 

वर्धा जिल्ह्यात पालकमंत्री पंकज भोयर यांच्या संकल्पनेतून मोतीबिंदू विरहित वर्धा जिल्हा अभियान सुरू आहे. या अभियान अंतर्गत जिल्ह्याच्या आठही तालुक्यातील शिबीर घेण्यात येत आहे. जवळपास दोन लाख रुग्णांची तपासणी यामध्यमातून केली जाणार असून पाच हजार शास्त्रक्रियेच नियोजन देखील करण्यात आले आहे. यावेळी बोलताना पालकमंत्री हेल्पलाइन बाबत घोषणा केली.  

नागरिकांचे फोन आल्यास 
जिल्ह्यामध्ये प्रशासनाच्या माध्यमातून अनेक शासकीय योजना सर्वसामान्य नागरिकांकरिता राबविण्यात येते. त्याची अंमलबजावणी कुठल्या भागात होत नसेल,, तर नागरिकांच्या सोयीकरिता पालकमंत्री हेल्पलाइन हे जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू करण्यात येत आहे. पालकमंत्री हेल्पलाइनच्या माध्यमातून नागरिकांचे फोन आल्यास तात्काळ त्यांच्या समस्याचे निराकारण प्रशासनाच्या माध्यमातून केले जाणार आहे. 

नागरिकांच्या फेऱ्या मारणे वाचणार 
अनेकदा नागरिकांना आपल्या अडचणी आणी समस्या सोडविण्यासाठी शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. पालकमंत्री भोयर यांच्या या अभियानमुळे नागरिकांना वारंवार शासकीय कार्यालयाचे चकरा माराव्या लागणार नाहीय हे मात्र खरे. अर्थात यातून नागरिकांची अडचण सोडविण्याचा माध्यम हाती घेतले जाणार आल्याचं पालकमंत्री पंकज भोयर यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात काँग्रेस पक्ष करणार मंथन

Mantralaya Ceiling Collapsed: मंत्री कॅबिनेट बैठकीत बिझी असतानाच मंत्रालयात छत कोसळलं, नेमकं काय घडलं, पाहा | VIDEO

Sevai Pulao Recipe : रोजचा डाळ-भात खाऊन कंटाळलात? जेवणाला खास बनवा चमचमीत शेवयाचा पुलाव

Raksha Bandhan Saree Gift: राखीपौर्णिमेच्या निमित्ताने तुमच्या बहिणीला भेट द्या ही सुंदर साडी

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणीने गोर-गरिबांचा 'आनंद' हिरावला; गणेशोत्सवात नाही मिळणार 'आनंदाचा शिधा'

SCROLL FOR NEXT