Wardha News Two school boy drowns in Ridhora dam incident in Selu taluka Saam TV
महाराष्ट्र

Wardha News: पोहण्याचा मोह जीवावर बेतला, एकाला वाचवण्याच्या नादात दुसराही बुडाला; वर्ध्यातील दुर्दैवी घटना!

Wardha Latest News: वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. रिधोरा धरणात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला आहे.

Satish Daud

चेतन व्यास, साम टीव्ही | ११ डिसेंबर २०२३

Wardha Latest News

वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातून एक दुर्देवी घटना समोर आली आहे. रिधोरा धरणात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला आहे. सुजल अवथळे (वय १६ वर्ष ), ओम धुर्वे(वय १७ वर्ष, राहणार इंदिरानगर ) अशी मृतकाची नाव आहे. रविवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मृत सुजल अवथळे आणि ओम धुर्वे दोघेही दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होते. रविवारी ते आपल्या आणखी एका मित्रांसोबत रिधोरा धरणावर फिरायला गेले होते. दरम्यान, धरण परिसरातील दगडावर बसून गप्पा मारत असताना यातील एका मित्राला पोहण्याचा मोह आवरला नाही. (Latest Marathi News)

त्याने कपडे काढून पाण्यात उडी घेतली. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. आपला मित्र बुडत असल्याचं पाहून दुसऱ्याने त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. मात्र, त्याला देखील पोहता येत नसल्याने दोघेही बुडाले.

दोन्ही मित्र बुडत असल्याच लक्षात येताच तिसऱ्या मित्राने आरडाओरड केली. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. दरम्यान, या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.

पोलिसांनी दोघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवले आहेत. दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या दोन मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : आईचा गळा दाबला, बेदम मारहाण केली; पोटच्या मुलाचं संतापजनक कृत्य। पाहा Video

अजितदादांना मुख्यमंत्री करण्यासाठी एकत्र का आले नाही? राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून आमदाराचा जोरदार हल्लाबोल|VIDEO

मुंबईत रात्री मोठा राडा; भाजप आमदाराकडून ड्रग्ज तस्काराला बेदम मारहाण

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताची चौकशी झाली पाहिजे - रुपाली पाटील

Crime: शरीरसंबंध ठेवताना बायकोनं नवऱ्याचा गळा चिरला; मृतदेहाजवळच भाच्यासोबत केले अश्लील कृत्य

SCROLL FOR NEXT