Samriddhi Highway Saam tv
महाराष्ट्र

Samriddhi Highway: समृद्धी महामार्गावर निलगायीला वाचविण्यात ट्रक पलटी; दारूच्‍या बाटलीसाठी नागरीकांची धावाधाव

समृद्धी महामार्गावर निलगायीला वाचविण्यात ट्रक पलटी; दारूच्‍या बाटलीसाठी नागरीकांची धावाधाव

साम टिव्ही ब्युरो

चेतन व्यास

वर्धा : समृद्धी महामार्गावर निलगाय आडवी आल्याने ट्रक पलटी (Accident News) झाल्याची घटना महाकाळ शिवारात घडली. यावेळी ट्रकमधल्या बियरच्या बाटल्यांचा रस्त्याशेजारीच सडा पडल्याने मिळेल तेवढ्या बॉटलसाठी नागरिकांची चांगलीच धावाधाव झाली. जेवढ्या हाती येतील तेवढ्या बॉटल घेत अनेकांनी पळ काढला. दारूबंदी (Wardha News) जिल्ह्यात ट्रक पलटी झाल्याने परिसरातील नागरिकांची चांगलीच चांदी झाली. (Latest Marathi News)

नागपुरच्या (Nagpur) वाडी येथील निशा ट्रान्सपोर्ट कंपनीचा ट्रक औरंगाबाद येथील एमआयडीसीतून बियरचे बॉक्स घेऊन नागपुरच्या दिशेने जात होता. दरम्यान सदर ट्रकच्या समोर समृद्धी महामार्गावरील महाकाळ शिवारात अचानक मोठी निलगाय आडवी आली. यावेळी उत्तरप्रदेशच्या लखीमपूर येथील ट्रक चालकाने निलगायीला वाचविण्यासाठी ब्रेक मारला. मात्र यात ट्रक रस्त्याच्या शेजारील खोलगट भागात पलटी झाला. ही घटना महाकाळ शिवारातील चॅनेल नंबर ५२ प्लस २०० नजिक घडली.

नागरीकांची बाटल्‍या उचलायला धाव

सदर घटनेत अंदाजे ९ ते १० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती असून सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. सदर घटनेची माहिती मिळताच सेलू पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. बियरचा ट्रक पलटल्याची वार्ता कानी पडताच परिसरातील नागरिकांनी सकाळी घटनास्थळी धाव घेत मिळेल तेवढ्या बियरच्या बाटल्या लंपास केल्याची चर्चा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kombdi Vade Recipe : गटारी स्पेशल मेजवानी! मालवणी कोंबडी वड्यांची रेसिपी, चव अशी की घरचे बोटं चाटत राहतील

Abhijeet Dipke : अभिजित दिपके राजकीय पक्ष स्थापन करणार? पत्रकार परिषदेत स्पष्टच सांगितलं

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Lizard : या ५ ट्रिक्स वापरा; घरातील पाली होतील कायमच्या गायब!

Police Transfer : पोलिस दलात मोठा फेरबदल, ३९ पोलिसांची तडकाफडकी बदली; नावं अन् धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT