Wardha News Saam tv
महाराष्ट्र

Wardha News : मद्यप्राशन करून बस चालविणाऱ्या चालकासह वाहक निलंबित; वर्धेतून ४५ वारकरी घेऊन रवाना झाली होती बस

Wardha News : वर्धा येथून निघालेली बस चालक सचिन गंगाधर गव्हाणे व वाहक प्रदीप ज्ञानेश्वर सूर्यवंशी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

Rajesh Sonwane

चेतन व्यास 
वर्धा
: आषाढी वारीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या जादा बस सोडल्या जात आहेत. त्यानुसार वर्ध्यामधून मागणी झाल्यानंतर ४५ वारकऱ्यांना घेऊन बस पंढरपूरसाठी रवाना झाली होती. दरम्यान या बसला यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद येथे अपघात झाला. हा बस चालक मद्यप्राशन करून बस चालवत असल्याची माहिती समोर आल्यानंतर विभागीय नियंत्रक संदीप रायमुलकर यांनी मद्यप्राशन करून असलेल्या चालकावर व वाहकावर निलंबनाची कारवाई केली. 

वर्धा (Wardha) येथून निघालेली बस चालक सचिन गंगाधर गव्हाणे व वाहक प्रदीप ज्ञानेश्वर सूर्यवंशी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान सोमवारी दुपारी साडेचार वाजता बस वर्धा जिल्ह्यातील ४५ वारकरी घेऊन पंढरपूरच्या (Pandharpur) दिशेने चालक सचिन गंगाधर गव्हाणे व वाहक प्रदीप ज्ञानेश्वर सूर्यवंशी हे बस घेऊन रवाना झाले. बस रात्री यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद येथील माहूर फाट्याजवळ पोहचताच मद्य प्राशनाच्या नशेत असलेल्या चालकाने रस्ता दुभाजकाला बस धडकवली. या घटनेत (St Bus) बसमधील ४५ प्रवासी थोडक्यात बचावले आहेत. तर बसमधील एक वयोवृद्ध महिला व मुलगा जखमी झाला आहे. या घटनेनंतर जखमीना नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले. 

दरम्यान यावेळी नागरिकांना चालक व वाहक हे दारूच्या नशेत असल्याचे लक्षात आले. उपस्थितांनी चालकाच्या बॅगची तपासणी केली असता त्याच्या बॅगमध्ये विदेशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. यावेळी पुसद पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले. तर बसला अपघात झाल्याची माहिती वर्धा आगाराला मिळताच आगार व्यवस्थापक यांनी तात्काळ बस चालक आणि वाहक यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. या अपघातामुळे पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना रात्री त्रास सहन करावा लागला. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मोठी बातमी! ठाकरेंचा दिग्गज नेता आणि नगरसेवकाविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: सोयाबीनचे बियाणे विक्री करणाऱ्या 'बूस्टर' कंपनीविरोधात अमरावतीत गुन्हा

SET Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! SET परीक्षा पुढे ढकलली, नेमकं कारण काय? कधी होणार परीक्षा? वाचा A to Z अपडेट्स

Sindhudurg Tourism : मालदीव विसरा! महाराष्ट्रातच आहे 'हा' निसर्गरम्य समुद्रकिनारा, पावसाळ्यात दिसतं आरशासारखं निळेशार पाणी

Salman Khan : सलमान खानने विकले मुंबईतील आलिशान घर; किती कोटींमध्ये झाली डील, आकडा पाहून व्हाल चकित

SCROLL FOR NEXT