Wardha News Saam tv
महाराष्ट्र

Wardha News: दोनच शिक्षक शिकवितात सातवीपर्यंतचे वर्ग; विद्यार्थी, पालकांनी शाळेला ठोकले कुलूप

दोनच शिक्षक शिकवितात सातवीपर्यंतचे वर्ग; विद्यार्थी, पालकांनी शाळेला ठोकले कुलूप

साम टिव्ही ब्युरो

चेतन व्यास

वर्धा : समुद्रपूर तालुक्याच्या पिपरी येथील जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेत (Teacher) शिक्षकाच्या मागणीसाठी आज पालकांसह विद्यार्थ्यांनी एल्गार पुकारलाय. शिक्षकाच्या मागणीसाठी आज शाळेला कुलूप ठोकत शाळेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. (Breaking Marathi News)

पिपरी (Wardha News) येथील जिल्‍हा परिषदेच्‍या शाळेत (ZP School) इयत्ता सातवीपर्यंत वर्ग आहे. मागील दोन वर्षांपासून शाळेत विज्ञान या विषयाच्या शिक्षकाची जागाही रिक्त आहे. एवढंच नव्हे तर नुकतेच येथील सहाय्यक शिक्षकही सेवानिवृत्त झाल्याने आता फक्त दोनच शिक्षक शाळेत आहे. यामुळे शाळेतील विद्यार्थी संख्‍येच्‍या तुलनेत शिक्षक कमी असल्‍याचे चित्र सध्‍या आहे.

दोनच शिक्षक सातवीपर्यंत शिकवितात

कार्यालयीन कामकाजसह हे दोन्ही शिक्षक सातव्या वर्गापर्यंत शिकवत आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमावर याचा परिणाम होत आहे. यामुळे तातडीने शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज ठाकरे यांची शिवतीर्थावर नेत्यांची बैठक

New Pension Rule: EPS पगार मर्यादा 25,000 रुपये; पण सर्वांनाच पेन्शन मिळणार नाही! जाणून घ्या नवे नियम

Congress Protest Live Update : "सर्वोच्च न्यायालयाला आंदोलनात ओढू नका!"; सूर्यकांत यांचा स्पष्ट इशारा

White Saree For Womens: महिलांसाठी पांढऱ्या रंगाच्या साड्यांचे सुंदर कलेक्शन, या 5 डिझाईन्स नवरात्रीसाठी बेस्ट

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अचानक टायर फुटला अन् क्षणात पेटला ट्रक, २ जणांचा होरपळून मृत्यू

SCROLL FOR NEXT