Praful Patel Saam tv
महाराष्ट्र

Praful Patel News : इंडिया आघाडी लोकांचा विश्वास, हे कधीच शक्य होणार नाहीय: प्रफुल्ल पटेल यांची टीका

Wardha News : इंडिया आघाडी लोकांचा विश्वास, हे कधीच शक्य होणार नाहीय: प्रफुल्ल पटेल यांची टीका

Rajesh Sonwane

चेतन व्यास 
वर्धा
: केंद्र सरकार विरोधात देशात विरोधी पक्षांना एकत्र करून एक आघाडी बनविण्यात आली आहे. ही आघाडी (Wardha) येणाऱ्या काळात लोकांचा विश्वास इंडिया आघाडी असं सांगण्यात येत आहे. ते कधीच शक्य होणार नाही; अशी टीका अजित पवार गटाचे खासदार प्रफुल पटेल (Praful Patel) यांनी केली आहे. (Maharashtra News)

वर्धेच्या धुनिवाले मठात आज अजित पवार गटाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. सदर मेळाव्यात प्रफुल पटेल यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना खासदार पटेल यांनी निशाणा साधला आहे. यावेळी आय डॉट एन डॉट डी डॉट आय डॉट ए डॉट हे इंडिया आघाडीच खर नाव आहे. या आघाडीत कीती मतभेद आहे हे मुंबईत पहायला मिळाल्याचे देखील पटेल म्हणाले. लवकरच निवडणूक आयोग आपला निकाल जाहीर करेल आणि यात अजित पवार गटाची राष्ट्रवादी हीच खरी (NCP) राष्ट्रवादी अस निकाल येईल ही अपेक्षा आहे. यामुळे कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे असं आवाहन ही प्रफुल पटेल यांनी कार्यकर्त्यांना केले.

इंडिया आघाडी अनेक मतभेद 

इंडिया आघाडीच चिन्ह एक साधा लोगो याबाबत विरोधी पक्षाचे नेते एकमत करू शकले नाही. म्हणून त्यांना लोगोच अनावरण थांबवावं लागलं. एवढंच नव्हे तर इंडिया आघाडीच कनव्हेनर नेमायचं होत. त्यात कोणी म्हणतं होत काँग्रेस होईल कोणी म्हणत नितीश कुमारच होईल किंवा इतरांच् होईल काहीच झाल नाही. १३ लोकांची समिती स्थापन केली. अश्या विविध समस्या आहे. जे या आघाडीत आता स्पष्ट दिसत आहे. यामुळे येणाऱ्या काळात लोकांचा विश्वास इंडिया आघाडी असं म्हणतात ते कधीच शक्य होणार नाहीय. अशी टीका प्रफुल पटेल यांनी केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: हवामान खात्याच्या येल्लो अलर्टनंतर नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार पाऊस

Suger-Free Modak Recipe: साखरेशिवाय बनवा स्वादिष्ट मोदक, जाणून घ्या सोपी रेसिपी

गणपतीसाठी गावी निघालेलं कुटुंब अचानक बेपत्ता, ४० तासांनी सापडलं, समोर आल्यानंतर त्यांनी घटनाक्रमच सांगितला | VIDEO

Janhvi Kapoor: जान्हवी कपूर लाल साडीत खुललं सौंदर्य, फोटोंवर लागल्या नजरा

Shocking : पत्नीला मारलं, नंतर पोलिसांना गुंगारा दिला, पण चिमुकलीनं आरोपी बापाचं पितळ उघडं पाडलं, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT