msrtc bus need to repair demands hinganghat passengers saam tv
महाराष्ट्र

MSRTC Bus : जीवावर उदार हाेऊन प्रवाशांना करावा लागताेय बसचा प्रवास, हिंगणघाट आगार लक्ष देईल का?

Hinganghat Latest Marathi News : हिंगणघाट-तावी या बसने मोहगाव, तावी, आर्वी, फरीदपूर या गावातील सुमारे 50 विद्यार्थी शिक्षणासाठी दररोज गिरड येथे येतात.

Siddharth Latkar

- चेतन व्यास

Wardha News :

राज्य परिवहन महामंडळ सुरक्षित प्रवासाची हमी देते खरी परंतु हिंगणघाट आगारात मनमर्जीने कळस गाठल्याचा प्रत्ययच सध्या येत आहे. खिडक्या खिळखिळ्या असलेली बस ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी सोडण्यात आल्याने हिंगणघाट आगार प्रवाशांच्या जीवावर तर उठला नाही ना, असा प्रश्न सध्या प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. (Maharashtra News)

गिरड व परिसरातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा प्रवास करून शाळा व महाविद्यालय गाठतात. सकाळी 10 वाजताच्या सुमारास गिरड येथे आलेली हिंगणघाट आगाराची तावी-हिंगणघाट ही बस (एमएच 40 एन 8621) अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली. ही बस मध्यभागातून जणू तुटलेली आणि तिच्या खिडक्या पूर्णतः तुटलेल्या होत्या.

सकाळच्या सुमारास आणखी दुसरा पर्याय नसल्याने शाळा, महाविद्यालयीन विदयार्थ्यांसह ग्रामस्थ मुकाट्यानेच बसमधून प्रवास करतात. पण खिळखिळ्या आणि प्रवाशांसाठी धोक्याची ठरणा-या या बसने हिंगणघाट आगारातील देखभाल व दुरूस्तीबाबत सुरू असलेला गलथान कारभार चव्हाट्यावर आणला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अनुचित घटना घडल्यावर जबाबदारी कुणाची

हिंगणघाट-तावी या बसने मोहगाव, तावी, आर्वी, फरीदपूर या गावातील सुमारे 50 विद्यार्थी शिक्षणासाठी दररोज गिरड येथे येतात. पण ग्रामीण भागातील नागरिकांसाठी रापमचे हिंगणघाट आगार भंगार बसेस सोडत असल्याचे वास्तव पुन्हा एकदा पुढे आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sarva Pitru Amavasya 2026: सर्वपितृ अमावस्येला 'या' ७ वस्तू घरात आणू नका; जाणून घ्या धार्मिक मान्यता

MLC Election: पुणे पदवीधर मतदारसंघात ट्विस्ट, भाजपने स्मिता जाधवांना उतरवलं; शरद लाडांच्या हालचालींनी राजकीय वर्तुळात खळबळ

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

SCROLL FOR NEXT