Lumpy Disease Saam tv
महाराष्ट्र

Lumpy Disease : पाच महिन्यात २३ जनावरांचा लम्पिने मृत्यू; कोट्यवधींच्या खर्चांनातरही निर्मूलन नाही

Wardha News : पाच महिन्यात २३ जनावरांचा लम्पिने मृत्यू; कोट्यवधींच्या खर्चांनातरही निर्मूलन नाही

Rajesh Sonwane

चेतन व्यास
वर्धा
: वर्षभरापूर्वी जनावरांमध्ये लम्पि आजाराचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला. यात अनेक जनावरांचा मृत्यू देखील झाला आहे. आता पुन्हा (Lumpy Disease) लम्पि आजाराने डोके वर काढले असून (Wardha) वर्धा जिल्ह्यात लम्पि आजाराने गेल्या पाच महिन्यात २३ जनावरांचा मृत्यू झाला आहे. (Latest Marathi News)

वर्धा जिल्ह्यात एप्रिल २०२३ पासून आजतागायत २८९ जनावरे लम्पिने बाधित झाली आहेत. यातील २०८ जनावरे आजारातून बरी झाली असून २३ जनावरे दगावली आहे. यात लम्पिमुळे ५ गाई, ६ बैल आणि १२ वासरांचा मृत्यू झाला आहे. तर अजूनही ५५ जनावरे लम्पि आजाराशी झुंज देत असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

कोट्यावधीचा खर्च तरीही नियंत्रणात नाही  

लम्पि आजाराच्या निर्मूलनासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. हा निधी मार्च २०२३ पर्यत खर्च झाला असल्याची माहिती आहे. नेमका खर्च इतक्या लवकर करण्यात आला असताना देखील लम्पिचे निर्मूलन होऊ शकले नाही. लसीकरणासाठी २ लाख ७५ हजार ९०० लसी प्राप्त झाल्या होत्या. यातील २ लाख ७२ हजार ३०० लसीकरण पुर्ण झालेय. वाढत्या लम्पि आजाराला आटोक्यात आणण्यासाठी कोट्यवधी खर्च झाले असताना देखील वर्ध्यात लम्पिचे निर्मूलन होऊ शकले नाही. त्यामुळे कोटीच्या वरचा खर्च नेमका झाला कुठे असाच प्रश्न उपस्थित होत आहेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : दिवसभरात मोठा निर्णय घेणे टाळा, मनातील इच्छा पूर्ण होतील; ५ राशींच्या लोकांची स्वप्न होणार पूर्ण

Crime: विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, गॅस सिलिंडर देतो म्हणत सोबत नेलं; अत्याचार करत व्हिडीओ काढले अन्...

शौर्यगाथा कार्यक्रमावरून राजकारण तापलं; मनसे नेते राजू पाटील यांचा भाजपवर जोरदार निशाणा

LPG Rule Change: मोठी बातमी! सर्वसामान्यांना मोठा झटका, गॅस सिलिंडरच्या नियमात बदल

मातृदिनी आई हळहळली! तुळजापुरात 19 वर्षीय तरुणाची हत्या|VIDEO

SCROLL FOR NEXT