Wardha News Saam tv
महाराष्ट्र

Wardha News : वर्धेच्या आलोडी परिसरात आढळले बिबट्याच्या पायाचे ठसे; वन विभागाकडून परिसरात पाहणी

Wardha News : वर्धा शहरापासून जवळ असलेल्या आलोडी परिसर हा जंगलाचा परिसर आहे. वर्धा शहराला लागून असल्याने आता वन्य प्राणी हे आपले अधिवास सोडून शहराकडे वळत असल्याचे दिसून येत आहे

Rajesh Sonwane

चेतन व्यास

वर्धा : वर्धा शहराला लागून असलेल्या आलोडी परिसरात बिबट्याच्या पायाचे ठसे आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. परिसरातील नागरिकांना हे ठसे दिसून आल्यानंतर याबाबत वन विभागाला याची माहिती देण्यात आली. यानंतर वन विभागाच्या टीमने येथे जाऊन पाहणी केली आहे. तसेच परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

वर्धा (Wardha) शहरापासून जवळ असलेल्या आलोडी परिसर हा जंगलाचा परिसर आहे. वर्धा शहराला लागून असल्याने आता वन्य प्राणी हे आपले अधिवास सोडून शहराकडे वळत असल्याचे दिसून येत आहे. याच दरम्यान रात्रीच्या सुमारास काही नागरिकांना या परिसरात बिबट्याच्या (Leopard) पायाचे ठसे आढळून आले. याबाबत तातडीने वर्धेच्या वन विभागाला माहिती देण्यात आली. वन विभागाच्या पथकाने घटनास्थळ गाठत पाहणी करत बिबट्याचे ठसे असल्याची खात्री केली. 

दरम्यान वन विभागाने (forest Department) आलोडी, साटोडा व कारला परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिलाय. रात्रीपासून वन विभागाचे पथक हे बिबट्याच्या मागावर असून त्याचा शोध घेत आहे. यासाठी काही ठिकाणी ट्रॅप कॅमेरे देखील लावण्यात आले आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT