Leopard Attack Saam tv
महाराष्ट्र

Leopard Attack: माकडाची शिकार करायला बिबट्या चढला झाडावर; बिबट्याचाच झाला मृत्यू

माकडाची शिकार करायला बिबट्या चढला झाडावर; बिबट्याचाच झाला मृत्यू

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चेतन व्यास

वर्धा : वर्धा जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यातील धामकुंड जंगल शिवारात वन कर्मचारी गस्त घालत असताना झाडाखाली बिबट्याचा (Leopard) मृतदेह आढळून आला. ही घटना लक्षात येताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. बिबट माकडाची शिकार करण्यासाठी झाडावर चढला एवढ्यात माकडाच्या (Wardha) पिलांची शिकार करताच अचानकपणे झाडाची फांदी तुटली आणि बिबट वरून खाली पडताच बिबट्याच्या डोक्याला गोट्याचा जबर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला. (Tajya Batmya)

माकडाच्या शिकारीच्या नादात बिबट्याला जीव गमवावा लागला. वनकर्मचारी जंगलात गस्त घालता असताना घटना उघडकीस येताच वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. तातडीने वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी घटनास्थळ गाठून पाहणी करत पंचनामा करण्यात आला. बिबट मादी जातीचा असून दोन ते तीन वर्षांच्या बिबट असल्याचे सांगण्यात आले.

पोटात माकडाची शिकार

बिबट्याचे पशुसंवर्धन विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केले. यावेळी बिबट्याच्या पोटात माकडाची शिकार (Leopard Attack) केल्याची आढळून आले. शवविच्छेदन दरम्यान पशुसंवर्धन विभागाचे डॉ. सुरेश मांजरे, डॉ. सुरेंद्र पराते, डॉ. राजेंद्र घुमडे यांनी केले. घटनास्थळी वर्ध्याचे राकेश शेपट, वनपरिक्षेत्र अधिकारी नरेंद्र सावंत, क्षेत्र सहाय्यक एस. एस. पठाण, एम. एस. ठोंबरे, वनपाल चंद्रमणी रंगारी, पुरुषोत्तम काळसाईत उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

मराठवाड्यात 3 जणांचं कुणबी प्रमाणपत्र अवैध; मनोज जरांगे फडणवीस सरकारवर संतापले|VIDEO

Kalyan : सख्ख्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला थेट जन्मठेपेची शिक्षा, कल्याण कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

Supreme Court: CJP वर कारवाई करा; याचिकेवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी, वाचा नेमकं प्रकरण काय?

गॅस भरलेले फुगे हवेत उडल्यानंतर कुठे जातात?

SCROLL FOR NEXT