Wardha Heavy Rain Saam tv
महाराष्ट्र

Wardha Heavy Rain : वर्धेच्या पाच तालुक्यात अतिवृष्टी; शाळांना सुट्टी जाहीर, हिंगणघाट तालुक्यातील तीन मार्ग वाहतुकीसाठी बंद

Wardha News : वर्धा जिल्ह्याच्या समुद्रपूर, हिंगणघाट, वर्धा, देवळी, सेलू या तालुक्यात सकाळपासुन मुसळधार पाऊस बरसत आहे. मुसळधार पाऊस झाल्याने वर्धा, वणा, बोर, पोथरा, यशोदा, धाम नदीसह लाल नाल्याच्या पाणी पातळीत वाढ

Rajesh Sonwane

चेतन व्यास 

वर्धा : हवामान विभागाने वर्धा जिल्ह्याला दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला होता. आज सकाळपासुन जिल्ह्याच्या आठ तालुक्यापैकी पाच तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. सकाळपासुन सुरु असलेल्या सततच्या पावसामुळे हिंगणघाट तालुक्यातील तीन रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहे. तर वर्धा- नागपूर महामार्गांवर पवनार येथे पाणी साचल्याने वाहतूक बंद झाली आहे. गोविंदपूर येथील नाल्याला पूर आल्याने गावात पाणी शिरण्याची शक्यता आहे. यामुळे अतिवृष्टी झालेल्या पाच तालुक्यात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

वर्धा (Wardha) जिल्ह्याच्या समुद्रपूर, हिंगणघाट, वर्धा, देवळी, सेलू या तालुक्यात सकाळपासुन मुसळधार पाऊस बरसत आहे. मुसळधार पाऊस (Heavy Rain) झाल्याने वर्धा, वणा, बोर, पोथरा, यशोदा, धाम नदीसह लाल नाल्याच्या पाणी पातळीत वाढ होऊन पाणलोट क्षेत्रातील नद्या व नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे. पर्यटन स्थळावर पर्यटकांनी गर्दी न करण्याचे आवाहन सुद्धा प्रशासनाने केले आहे. दरम्यान वर्धा- नागपूर महामार्गांवर पवनार येथे रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच पिपरी येथील उड्डाणंपूलाखाली सुद्धा पाणी साचले आहे. अतिवृष्टी होत असताना भर पावसात जिल्हाधिकारी रस्त्यावर उतरले आहेत. 

सकाळपासून सुरु असलेल्या पावसामुळे जिल्हाधिकारी यांनी तालुक्यातील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. हिंगणघाट तालुक्यातील हिंगणघाट ते उमरी मुरबाड रस्ता, हिंगणघाट ते येनोरा, हिंगणघाट ते कुंभी सातेफळ हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. हिंगणघाट तालुक्यात एक गोठ्यावर वीज पडल्याने गोठा पूर्णपणे जळून खाक झाला आहे तर बैल जखमी झाला आहे.पावसामुळे सध्या जनजीवन विस्कळीत झाले असून प्रशासन सतर्क असल्याच दिसतय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Tax Free Income: कामाची बातमी! या १० ठिकाणाहून येणाऱ्या पैशांवर एक रुपयाही टॅक्स नाही; ITR भरण्यापूर्वी या गोष्टी वाचाच

Worli Tourism: वरळीपासून अगदी जवळची आणि खास ठिकाणं, One Day Trip साठी ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

SCROLL FOR NEXT