Fraud Case Saam tv
महाराष्ट्र

Fraud Case : शेती अनुदान देण्याच्या नावाने फसवणूक; वृध्द महिलेस दोन लाख १५ हजार रुपयांत गंडविले

Wardha News : वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील रोहणी येथील वृद्ध महिलेस पंचायत समितीचे कर्मचारी असल्याचे सांगत शेती अनुदान मिळवून देण्याचे सांगितले. या नावाखाली महिलेची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे

Rajesh Sonwane

चेतन व्यास 
वर्धा
: वेगवेगळ्या कारणांनी फसवणूक करण्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. प्रामुख्याने अधिकच मोबदला मिळवून देण्याच्या आमिषाला अनेकजण बळी पडत असतात. अशाच प्रकारे शेती अनुदान मिळवून देण्याचे आमिष देत एका वृद्ध महिलेची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. यात वृद्धेस दोन लाख १५ हजार रुपयात गंडविण्यात आल्याचा प्रकार वर्धा जिल्ह्यात उघडकीस आला आहे. 

वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील रोहणी येथील वृद्ध महिलेस पंचायत समितीचे कर्मचारी असल्याचे सांगत शेती अनुदान मिळवून देण्याचे सांगितले. या नावाखाली वृद्ध महिलेची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. यात सदर इसमाने वृध्द महिलेस दोन लाख १५ हजार रुपयांनी गंडविले. मोटारसायकलने आलेल्या दोन व्यक्तींनी महिलेचे दोन लाख १५ हजार रूपये लंपास केले. 

गुन्हा दाखल करत संशयित ताब्यात 

दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे वृद्धेच्या लक्षात आले. यानंतर त्या वृद्धेने देवळी पोलीस ठाण्यात जात घडल्या प्रकाराबाबत पोलिसांना सांगितले. यानंतर महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी फसवणूक करणाऱ्यांचा शोध घेतला असता संशयीत आरोपीला अटक करण्यात आली आहे.

बसमध्ये चढताना दागिने लंपास
महिला बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने एक लाख ४१ हजारांचा ऐवज असलेली महिलेची पर्स चोरट्यानी लंपास केली. महिला नागपूरला जाण्याकरिता बसमध्ये चढताना अज्ञात चोरट्याने हात साफ केला. यामध्ये रोख रक्कम व सोन्याचे दागिने ठेवलेले होते. पर्स चोरी गेल्याचे लक्षात येताच महिलेच्या तक्रारीवरुन शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वर्धा पोलीस चोरट्याचा शोध घेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vat Purnima 2026 : वटपौर्णिमेचा सण 'या' पदार्थाशिवाय अपूर्ण, फक्त १० मिनिटांत बनेल आंब्याची स्पेशल रेसिपी

घरबसल्या ५ मिनिटांत ट्रान्सफर करा जुन्या कंपनीचा PF; चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळवण्यासाठी फॉलो करा 'ही' एक ट्रिक

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 8व्या वेतन आयोगाबाबत लवकरच मोठा निर्णय होणार, किती असेल फिटमेंट फॅक्टर? वाचा...

Maharashtra News Live Update : मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयासमोर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला

Health checkups after 40: वयाच्या 40 नंतर शरीरात सुरू होतात हे बदल, डॉक्टरांनी सांगितल्या या 4 टेस्ट करून घ्याच!

SCROLL FOR NEXT